Officials, representatives, etc. of various farmers' organizations participating in the march against the forced loan recovery of the District Central Bank. esakal
नाशिक

Nashik District Bank: ..अन्यथा जिल्हा बॅंकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका; शेतकरी संघटनांचा मोर्चा

District Bank: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात जिल्हा रुग्णालयासमोर २७२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी (ता.२७) मोर्चा काढला होता.

सकाळ वृत्तसेवा

Nashik District Bank : शेतकऱ्यांच्या सातबारा खाते उताऱ्यावर बँकेचे नाव लावणे बंद करावे या मागणीसह आजवर वेळोवेळी निघालेल्या शासन निर्णय, उच्च न्यायालय यांच्या निर्णयाच्या प्रतींचा दाखला देत शरद जोशी विचार मंचचे राज्याध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी येत्या १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांवरील अन्याय बंद न झाल्यास, जिल्हा बँकेसह सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला. ()

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुली विरोधात जिल्हा रुग्णालयासमोर २७२ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनास्थळापासून जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवारी (ता.२७) मोर्चा काढला होता. निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्या दालनात बैठक होऊन बँकेची सक्तीची कर्ज वसुली बंदसंदर्भात निवेदन दिले.

यावेळी आदिवासी संघर्ष समितीचे कैलास बोरसे यांनी बँकेच्या आतापर्यंतच्या अन्यायाविरोधात सविस्तर विवेचन केले. तर भगवान बोराडे यांनी बँकेची वसुली तत्काळ थांबवावी, दिलीप पाटील यांनी बँकेच्या नावे लावणे थांबवावेत व लावलेली नावे काढावीत, अशी मागणी बैठकीत केली.

बैठकीस जिल्हा बँकेचे प्रतिनिधी जिल्हाधिकारी कार्यालयात न आल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त बँकेचा निषेध नोंदवला. निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांनी याबाबत जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जिल्हा बँकेसंदर्भात योग्य ते निर्णय घेण्याचे आदेश दिले. (latest marathi news)

यानंतर, आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने लागलीच जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा बँकेचे प्रतिनिधी याठिकाणीही उपस्थित नसल्याने आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असता मुलाणी यांनी लागलीच बँकेचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांना बैठकीसाठी तत्काळ पाचारण केले. बँकेकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यथा मांडल्या.

या संदर्भात जी कायदेशीर कारवाई असेल ती करण्यासाठी आपण दिलेल्या शासन निर्णय न्यायालयाचे आदेश हे तपासून पाहून योग्य ते आदेश तत्काळ देत आहे, बँकेच्या अधिकाऱ्यांना छोट्या कर्जदारांची वसुली न करण्याचे व छोट्या कर्जदारांच्या सातबारा खाते उतारावर नावे न लावण्याचे आदेश मुलाणी यांनी बँकेचे अधिकाऱ्यांना दिले.

शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, कोणी शेतकरी आत्महत्या करणार नाही यासंदर्भात बँकेने योग्य ती दखल घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. चर्चेमध्ये विठ्ठल राजे पवार, कैलास बोरसे, भगवान बोराडे, दिलीप पाटील, धोंडिराम थैल, जयराम बळिराम, प्रभाकर थोरात, मोहन बहिरम, जितू पवार, संगीता कोल्हे, मनिषा वाघेरे, नामदेव बुरगुडे, भगवंत बंडाळे, खंडेराव मोगरे, उमाकांत शिंदे, दत्तात्रय गवळी आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT