Nashik News : निफाड तालुक्यातील शिरसगाव-वडाळी नजीक शिवारात ‘सुखोई-३०’ विमान कोसळले. घटनेपूर्वी हे विमान जमिनीपासून अत्यंत कमी अंतरावर आल्याचा थरारक अनुभव एका तरुणाने सांगितला. विशेष म्हणजे या विमानाचे छायाचित्र काढल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळ्याचे या तरुणाने सांगितले. (Photograph taken before Sukhoi 30 aircraft crashed in Niphad taluk)
कारसूळ येथील रौळस शिवारातील शेतकरी विजय उगले हे नेहमीप्रमाणे घराबाहेर कामात व्यस्त होते. ओझर विमानतळावर विमाने उतरण्यासाठी दररोज याच परिसरातून मार्गक्रमण करतात. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना त्याची सवयच झाली आहे.
परंतु मंगळवारी (ता. ४) दुपारी १ वाजून १३ मिनिटांनी एक विमान जमिनीपासून नेहमीपेक्षी कमी अंतरावर मार्गक्रमण करीत होते. (latest marathi news)
शिवाय आवाजही मोठा असल्याने विजय उगले काहीसे सावध झाले. ही बाब त्यांनी इतरांनाही सांगितली. विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड असावा, असा अंदाज त्यांनी बांधला. नेहमीपेक्षा कमी उंचीवरून उडणाऱ्या विमानाचे फोटो देखील त्यांनी काढले.
त्यानंतर अवघ्या दोन मिनिटांनी शिरसगाव-वडाळी नजीक शिवारात विमान कोसळल्याचे त्यांनी दैनिक ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.