Nashik News : वीज रोहित्रावर बसलेल्या मोराची शिकार करण्यासाठी गेलेल्या बिबट्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २१) सकाळी उघडकीस आली. उच्च दाबाच्या वीज तारेला स्पर्श झाल्याने क्षणार्धात बिबट्या तडफडून गतप्राण झाला. यात मोराचाही मृत्यू झाला. पिंपळगावच्या कादवा नदीलगत गेल्या दोन महिन्यांपासून प्राण्यांवर जीवघेणा हल्ला करून बिबट्याने धुमाकुळ घातला होता. (Pimpalgaon Baswant leopard lost his life in peacock hunting )
कादवा नदी तीरालगत आमदार दिलीप बनकर यांच्या शेतालगत बिबट्याने दोन महिन्यांपासून ठाण मांडले होते. लपण्यासाठी उसाचे क्षेत्र व पाणी पिण्यासाठी कादवा नदीचा काठ असल्याने बिबट्याने तळच ठोकला होता. भक्ष्य टिपण्यासाठी रात्रीच्या वेळेला तो बाहेर पडत होता. त्यात गाई, वासरे, कुत्री या प्राण्यांची बिबट्याने शिकार केली होती. बिबट्याने अक्षरश: दहशत पसरविली होती. नागरिकांनी वन विभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र, बिबट्याचा शिकार करताना दुर्दैवी मृत्यू झाला. (latest marathi news)
एकाचवेळी अंत्यसंस्कार
रविवारी पहाटे बिबट्या शिकारीसाठी परिसरात मुक्तसंचार करीत होता. पानसरे वस्तीलगत गट नंबर ४९९ मधील उच्च दाबाच्या वीज रोहित्राजवळ बिबट्याला मोर दिसला. बिबट्या शिकार करणार या भीतीने मोर रोहित्राच्या वीज प्रवाहाच्या धोकादायक ठिकाणी बसला. त्याचवेळी बिबट्याने मोरावर झडप मारण्यासाठी उडी घेतली.
पण, त्या दरम्यान बिबट्याच्या शेपटीचा स्पर्श रोहित्राच्या वीज प्रवाहाच्या ठिकाणी झाला. वीजेचा जोरदार धक्का लागल्याने बिबट्याच्या शरीरात वीज प्रवाह आल्याने तो तडफडू लागला. काही वेळात त्याचा मृत्यू झाला. नऊ वर्ष वय असलेला बिबट्या नर जातीचा होता. वनविभागाचे अधिकारी नाना देवरे, विजय टेकणार, अजय शिंदे यांनी पंचनामा करून बिबट्या व मोराच्या मृतदेहावर शिरवाडे वणी येथे अत्यसंस्कार केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.