In Pimpalgaon Baswant Damage to onion caused by shed collapse due to stormy winds. esakal
नाशिक

Nashik Rain Damage : वादळी वाऱ्याने द्राक्षनगरीत दाणादाण; 22 तासानंतर वीजपुरवठा सुरळीत

Nashik News : पिंपळगाव शहरासाठी शुक्रवारची (ता. ७) सायंकाळ कर्दनकाळ ठरली. वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने द्राक्षनगरीची अक्षरश: दाणादाण उडवून दिली.

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव शहरासाठी शुक्रवारची (ता. ७) सायंकाळ कर्दनकाळ ठरली. वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने द्राक्षनगरीची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. झाडे, शेड कोसळले. शाळांचे पत्रे उडाल्याने तब्बल दहा लाख रूपयांहून अधिक नुकसान झाले. वीजवाहिन्या तुटल्याने खंडीत झालेला वीजपुरवठा तब्बल २२ तासानंतर पूर्ववत झाला. यापूर्वी कधीही न अनुभवलेले वादळ शुक्रवारी घोंगावल्याने पिंपळगावकरांमध्ये त्सुनामीची धडकी भरली. (Pimpalgaon gale force winds and torrential rains)

शुक्रवारी दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी झाल्याने पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज होता. पावसाने सलामी देताना सोबत भयभयीत करणारे वादळ आणले. तासाभराच्या वादळाने पिंपळगाव शहरात मोठी झळ पोहचवून गेले.

शहरातील २८ हुन अधिक लहान-मोठी झाडे कोसळली. उंबरखेड व चिंचखेड रस्त्याला वादळाचा मोठा तडाखा बसला. कांद्याच्या चाळीचे शेड भुईसपाट झाल्याने कांदा भिजून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. बसस्थानकासमोर झाड फळाच्या दुकानावर कोसळले.

वर्ग खोल्यांचे पत्रे उडाले

वादळाची सर्वाधिक झळ पिंपळगाव शहरातील प्राथमिक शाळेच्या इमारतींना बसली. बसस्थानका लगतच्या शाळेतील नऊ वर्ग खोल्यांचे पत्रे वादळाने हवेत उडाले. पत्रे उडाल्याने पावसाचे पाणी थेट वर्ग खोल्यांत आले. तेथील संगणक पाण्यात भिजल्याने नादुरुस्त झाले.

आहेरगाव रस्त्यावरील जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्यांचे पत्रे वादळी वाऱ्यात जमिनदोस्त झाले. वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटाने नागरीकांच्या जीवाचा थरकाप उडविला होता. सुदैवाने यात कोणतीही जीवित्तहानी झाली नाही. (latest marathi news)

वीजवाहिन्या तुटल्या

वादळी वाऱ्याचा सर्वाधिक तडाखा महावितरणला बसला. उन्मळून पडलेली झाडे थेट वीजतारांवर कोसळली. त्यात शहराला वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनी झाडांनी तुटली. उपनगरांमध्येही झाडांच्या फाद्या वाहिनीवर पडल्या. काही ठिकाणी खांब कोसळले. त्याचा परिणाम शुक्रवारी पाच वाजता खंडीत झालेला वीजपुरवठा रात्रभर सुरू झाला नाही. त्यामुळे नागरिकांसाठी ही रात्र घाम काढणारी ठरली. शहरात दहा लाख रूपयांहुन अधिक नुकसान झाल्याचे समजते. महसूल विभागाकडून पंचनाम्यांचे काम सुरू आहे.

"प्राथमिक शाळा सुरू होण्याच्या तोंडावर वर्गखोल्यांचे मोठे नुकसान झाले आहे. खासदार भास्कर भगरे यांनीही नुकसानीची पाहणी केली आहे. प्रशासनाला माहिती दिली असून लवकरात लवकर उपाययोजना करण्याबाबत कळविले आहे." - भास्करराव बनकर, सरपंच, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT