नाशिक : शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेत नाशिक जिल्हा पाचव्या क्रमांकावर राहिला. २० सुवर्ण, २० कांस्य व तब्बल ३७ रौप्यपदकांची कमाई करत नाशिकने क्रीडा क्षेत्रात नवा इतिहास रचला आहे.
यात विविध क्रीडा प्रकारांचा समावेश होता. (Nashik placed fifth in Maharashtra Olympics competition grand layout of medals nashik news)
महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धा जानेवारीमध्ये तब्बल ३९ क्रीडा प्रकारात घेण्यात आली. राज्यातील पुरुष व महिलांचे सर्वोत्तम ८ संघ यात सहभागी झाल्याने त्यांचा खेळ पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळाली. मल्लखांब, सॉफ्टबॉल, योगासन, रोलर स्केटिंग, सॉफ्ट टेनिस, गोल्फ आणि विशेष बाब म्हणून शूटिंगबॉल अशा सात नव्या क्रीडा प्रकारांचा समावेश होता.
यात नाशिकच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत तब्बल ७७ पदके मिळवली. यात टेबल टेनिस, नेमबाजी, मल्लखांब, रोईंग आदी क्रीडा प्रकारात नाशिकच्या खेळाडूंनी आपली चुणूक दाखवली.
विविध क्रीडा संघटनांच्या खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी होत नाशिकच्या क्रीडा विश्वाला नवे नाव मिळवून दिले आहे. खो-खो, कबड्डी, कुस्ती सारख्या देशी खेळात आपला पूर्वीपासून दबदबा आहे.
यात नाशिकमधील ग्रामीण भागाचे खेळाडू सातत्याने नावलौकिक मिळवत आहेत. केवळ महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेपर्यंत मर्यादित न राहता खेलो इंडियाच्या माध्यमातून केरळ येथेही आपले खेळाडू नाशिकचे नाव उंचावत आहेत. नाशिकमधील विजेत्या सर्व खेळाडूंचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सत्कारही करण्यात येणार आहे.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
"नाशिक जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये ऑलिंपिक स्पर्धेत खेळण्याची क्षमता आहे. त्या दृष्टीने खेळाडूंना योग्य मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. खेलो इंडिया स्पर्धेतही नाशिक चांगली कामगिरी करेल." - अविनाश टिळे, प्र. जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक
जिल्हानिहाय पदकांची संख्या
जिल्हा ...सुवर्ण...रौप्य...कांस्य...एकूण
पुणे : ७९...७१...६२...२१२
ठाणे:३६...२३...२०...७९
कोल्हापूर:३५...३५...३३...१०३
मुंबई शहर:२६...२१...३३...८०
नाशिक : २०...२०...३७...७७
मुंबई उपनगरे:२०...१२...१८...५०
सोलापूर: २०...९...१४...४३
नागपूर :१६...२०...२०...५६
सातारा:१३...२३...१८...५४
सांगली:८...६...७...२१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.