Garbage piled up in a rocky signal area that invites the emergence of mosquitoes esakal
नाशिक

Nashik News : डासांच्या समस्येने जुने नाशिककर त्रस्त; उपाययोजनांची मागणी

Nashik News : डासांच्या समस्येने जुने नाशिककर त्रस्त झाले आहे. कचऱ्याचे प्रमाण आणि थोड्या फार प्रमाणात होणाऱ्या पावसाने दिवसेंदिवस डासांचे प्रमाण वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : डासांच्या समस्येने जुने नाशिककर त्रस्त झाले आहे. कचऱ्याचे प्रमाण आणि थोड्या फार प्रमाणात होणाऱ्या पावसाने दिवसेंदिवस डासांचे प्रमाण वाढत आहे. भीमवाडी, पंचशीलनगर, फुले मार्केट परिसरात अधिक प्रमाण आहे. जुने नाशिक परिसराच्या नागरी समस्यांकडे महापालिकेचे नेहमी दुर्लक्ष राहिले आहे. विशेष करून कचऱ्याची समस्या. (plagued by mosquito problem)

जुने नाशिक भागाचे प्रवेशद्वार असलेल्या द्वारका आणि गंजमाळ सिग्नल परिसराच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे साम्राज्य दिसून येते. अशाच प्रकारे विविध भागांत कचरा पडून असतो. त्यातून डासांचे प्रमाण वाढत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. आवश्यक प्रमाणात पाऊस पडला नसला तरी काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे.

रस्त्यावर तसेच विविध भागात कचराकुंडीवर पडून असलेला कचरा पावसाच्या पाण्याने कुजत आहे. प्लॅस्टिक पिशव्या आणि इतर कचऱ्यामध्ये पावसाचे पाणी साचत आहे. यामुळेही डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. संपूर्ण जुने नाशिक परिसरात डासांच्या समस्येने रहिवासी त्रस्त झाले आहे.

तसेच भीमवाडी परिसरात उघड्या गटारीतील सांडपाणी आणि इतर विविध भागांमध्ये ठिकठिकाणी साचलेले पावसाचे पाणी डासांसाठी पोषक ठरत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. घरोघरी रुग्ण आढळून येत आहे. मलेरिया विभागाकडून औषधाची फवारणी करण्यात यावी. दिवसातून दोन ते तीन वेळा कचराकुंडीची स्वच्छता करत कचरा उचलून घ्यावा, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)

डास उत्पत्तीचे केंद्र नष्ट करावीत

नारळाच्या कवट्या, टायर, खड्डे, प्लॅस्टिक कचरा यात पावसाचे पाणी साचून डासांची संख्या वाढत असते. महापालिकेच्या मलेरिया आणि घनकचरा विभागाकडून कारवाई करावी. विविध भागांची पाहणी करत नारळ व्यावसायिक, पंक्चर दुकानदार यांना उघड्यावर नारळाच्या कवट्या तसेच टायर फेकू नये.

अशा सूचना कराव्यात. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करावी. खड्डे बुजविण्यात यावे. रस्त्यावर टायर आणि नारळाच्या कवट्या फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. यामुळे डासांचे वाढत्या प्रमाणावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT