पंचवटी (जि. नाशिक) : प्लॅस्टिक कॅरिबॅग, डिश व प्लॅस्टिक ग्लासचा वापर व सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये पंचवटी परिसरात १५ हजार रुपयांचा दंड व २० किलो प्लॅस्टिक व ४ किलो प्लॅस्टिक पत्रावळ्या जप्त करण्यात आले. (Nashik Plastic Ban 15 thousand fine for shopkeepers who use plastic in Panchavati Nashik news)
विभागीय अधिकारी कैलास राभडिया, विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे नितीन चौधरी, राजेंद्र सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत प्रतिबंधित प्लॅस्टिक जप्ती मोहीम राबविण्यात आली. तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षक उदय वसावे, दुर्गादास माळेकर, किरण मारू, दीपक चव्हाण, नरेश नागपुरे, विक्की टाक, संदेश खाटीगडे, पुष्कर बारे, वाहनचालक संजय जाधव उपस्थित होते.
पेठ फाटा, दिंडोरी नाका, बाजार समिती, शरदचंद्रजी पवार मार्केट यार्ड, आरटीओ परिसर, हिरावाडी, म्हसरूळ या भागात पाहणी दरम्यान प्रतिबंधित प्लॅस्टिक कॅरिबॅग, प्लॅस्टिक डिश, प्लॅस्टिक ग्लास व पत्रावळ्या वापर करताना आढळल्याने ५००० रुपये याप्रमाणे तीन व्यावसायिकांवर कारवाई करून १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.