Ayodhya Ram Mandir esakal
नाशिक

Ayodhya Ram Mandir: रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेत नाशिकला महत्त्वाचे स्थान! राज्यातील 360 जणांच्या यादीत 29 जण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या २२ जानेवारीला रामलल्लाची मूर्ती अयोध्येतील भव्य राममंदिरातील गर्भगृहात विराजमान होत आहे

दत्ता जाधव

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत येत्या २२ जानेवारीला रामलल्लाची मूर्ती अयोध्येतील भव्य राममंदिरातील गर्भगृहात विराजमान होत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील चार हजार सातशे संतांसह विद्वानांना आमंत्रित करण्यात आले आहे.

यात राज्यातील तब्बल ३६० संत, महात्म्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. जिल्ह्यातून २९ संतांसह शहरातील तिघांना वेद-मंत्रपठणासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने अयोध्येचे आमंत्रण प्राप्त होणे, हा नाशिकचा सन्मान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (Nashik plays important role in installation of Ramlala in ayodhya 29 people in list of 360 people in state Nashik News)

अयोध्येतील रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदू परिषद, श्रीराम जन्मभूमी न्यास प्राधिकरणाकडून देशभरातील ब्राह्मण व विद्वांनांना आमंत्रित करण्यात आले आहे.

यात राज्यातील साडेतीनशेहून अधिक संत व विद्वान सोहळ्यात सहभागी होत आहेत. यात राज्यभरातील ३६०, तर पश्‍चिम व उत्तर महाराष्‍ट्रातून १२० विद्वानांचा समावेश आहे.

त्र्यंबकराज देवस्थानासह संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ देवस्थानच्या अध्यक्षांना सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

याशिवाय दिंडोरी येथील आध्यत्मिक केंद्राचे अण्णासाहेब मोरे, दिगंबर आखाड्याचे रामकिशोरदास शास्त्री, त्र्यंबकेश्‍वर येथील शंकराचार्य सरस्वती, वारकरी संप्रदायाचे डॉ. रामकृष्ण महाराज लहवीतकर, महंत रघुनाथदास देवबाप्पा, कैलास मठाचे स्वामी संविदानंद सरस्वती, तपोवनातील लक्ष्मीनारायण आखाड्याचे महंत रामसनेहीदास महाराज, माधवदास राठी महाराज, काळाराम मंदिर ट्रस्टचे महंत सुधीरदास पुजारी, देवळ्याचे संजय महाराज धोंडगे, हरसूल येथील आदिवासी संत सीतारामबाबा चौधरी, स्वामी कंठानंद महाराज, बेजे येथील स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती, भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले, पेठ येथील डॉ. रमणगिरी महाराज, भारत सेवाश्रमाचे स्वामी परिपूर्णानंद महाराज, प्रभुणे महाराज, साध्वी ताराबाई बागूल, कळवणच्या साध्वी मनीषादीदी, जायखेडा येथील यशोदाअक्का महाराज, सायखेडा येथील कमलाकांताचार्य महाराज, भन्ते श्रद्धानंद थेरो, श्रावण महाराज अहिरे आदींचा समावेश आहे.

तीन ब्रह्मवृदांचा सन्मान

अयोध्येतील धार्मिक सोहळ्यासाठी वेदोनारायण स्मार्तचुडामणी शांतारामशास्त्री भानोसे, वेदशास्त्रपंडित दिनेशशास्त्री गायधनी यांच्यासह श्री त्र्यंबकेश्‍वर येथील त्रिविक्रमशास्त्री जोशी यांना खास पुरोहित म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

एकाचवेळी एवढ्या मोठ्या संख्येने नाशिकच्या ब्रह्मवृंदांचा यानिमित्ताने अयोध्येत सन्मान होणार असल्याची प्रतिक्रिया शहरातील धार्मिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

टेंट कॉलनीची निर्मिती

रामलल्लाच्या सोहळ्यासाठी देशभरातून जैन, लिंगायत, बौद्ध, श्री समर्थ रामदास, नाथ संप्रदाय असे विविध संप्रदाय व पंथाचे विद्वान व संत सहभागी होणार आहेत.

हे सर्व आपल्या खर्चाने अयोध्येत दाखल होणार असून, त्यांची व्यवस्था नव्याने विकसित करण्यात आलेल्या टेंट कॉलनीत करण्यात आली आहे. हे सर्व संत व विद्वान रेल्वे, विमान, तसेच स्वतःच्या वाहनाने १८ तारखेला अयोध्येकडे मार्गस्थ होतील.

राज्यासह उत्तर महाराष्टातील बहुतेक आमंत्रणे देण्यात आल्याची माहिती पश्‍चिम महाराष्ट प्रांतपाल, धर्माचार्य व संपर्कप्रमुख माधवदास राठी महाराज यांनी दिली.

१५ फेब्रुवारीला विशेष दर्शनव्यवस्था

१५ फेब्रुवारीला जिल्हाभरातील संत, कारसेवक, भाविक व विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या दर्शनाची अयोध्येत खास व्यवस्था करण्यात आली आहे. याकाळात प्रत्येक प्रांतातून साधारण दोन हजार भाविकांची अयोध्येत दर्शनाची व्यवस्था केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FM Souza: हायकोर्टाने सांगितला कला आणि अश्लीलतेतील फरक; 'लव्हर्स' अन् 'न्यूड' कलाकृती नष्ट करण्यास दिला नकार

Diwali 2024 Reels and Video: 'दिन दिन दिवाळी..' फोटो अन् व्हिडिओसाठी वापरा 'हे' ट्रेंडी कॅप्शन इंस्टाग्रामवर पोस्ट करताच लाईक्स, व्हियूजचा होईल वर्षाव

Jalgaon Crime News : शाळकरी मुलीचे व्हिडिओ व्हायरल करून ‘ब्लॅकमेलिंग’! दोन संशयितांना अटक; मोबाईल जप्त

'शंभूराज देसाईंचा पराभव हेच उद्धव ठाकरेंचं ध्येय'; पाटणमध्ये तिरंगी लढत शक्य? सत्यजित पाटणकर कोणती भूमिका घेणार?

'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्याचा मोठा गौरव; इंदूच्या दत्तोबांची थेट राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी, पोस्ट शेअर करत म्हणाला-

SCROLL FOR NEXT