Police  esakal
नाशिक

Nashik Police : पंतप्रधान मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या आज सभा; ग्रामीण पोलिसांचे ढिसाळ नियोजन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपळगाव बसवंत येथे, तर शरद पवार यांची वणीमध्ये आणि उद्धव ठाकरे यांची बुधवारी (ता. १५) नाशिकमध्ये सभा होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असला तरी यातून जिल्हा ग्रामीण पोलिसांचे ढिसाळ नियोजन दिसून आले आहे. (Nashik PM Modi Sharad Pawar Uddhav Thackeray meeting today)

बुधवारी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवंत येथे जाहीर सभा होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांकडून शहर पोलिसांच्या मदतीने बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, या सभेसाठी परजिल्ह्यातूनही जादा बंदोबस्त दाखल झाला आहे. यामुळे पिंपळगाव बसवंतच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात, नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाच्या उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली दोनशे अंमलदार, पन्नास अधिकारी अशी जादा कुमक रवाना करण्यात आली आहे.

याशिवाय, राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) कमांडोही सभासथळी तैनात असतील. त्याचप्रमाणे, परजिल्ह्यातून सुमारे दोन हजार ५०० पोलिसांची जादा कुमकही येथे दाखल झाली आहे. (latest marathi news)

पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात पोलिस महासंचालक रश्मी ठाकरे यांनी बंदोबस्ताची आढावा बैठक घेतली असता, त्यांनी ग्रामीण पोलिसांच्या नियोजनावरून नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांमध्ये असमन्वयाचा अभाव दिसून आला. मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. १३) ग्रामीणच्या आडगाव अधीक्षक कार्यालयात बंदोबस्तासंदर्भात शहर आयुक्तालयाचे अधिकारी-कर्मचाऱ्यांना बोलाविले.

परंतु दुपारपर्यंत थांबल्यानंतर त्यांना अधीक्षकांनी पिंपळगाव बसवंत येथे बोलावून घेतले. शहराचे पथक पिंपळगावला पोचल्यानंतर दुपारी साडेचारला अधीक्षकांनी बंदोबस्तासंदर्भात अवघ्या काही मिनिटांत सांगितले. त्यातही बंदोबस्ताचे ठोस नियोजन नव्हते. मंगळवारी (ता. १४) पुन्हा अधिकारी-कर्मचारी पोचले असता त्यांना दुपारनंतर बंदोबस्ताचे नियोजन देण्यात आले. यामुळे एकूणच ग्रामीण पोलिसांचा गलथानपणा व असमन्वयाचा अभाव दिसून आला.

"पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलिस बंदोबस्तासह एसपीजीचा विशेष बंदोबस्त तैनात आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून समस्या निर्माण होऊ शकेल, त्याविरोधात नोटिसा बजावून कारवाई करण्यात आली आहे." - आदित्य मिरखेलकर, अपर पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण पोलिस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT