A gang of bogus sureties was arrested from a lodge in Nashik Road. Along with Deputy Commissioner Monika Raut, Assistant Commissioner Dr. Sachin Bari, Police Inspector Ramdas Shelke and Anti Terrorism Squad. esakal
नाशिक

Nashik Crime News : आरोपींना जामीन करून देणारी बोगस टोळी जेरबंद; बनावट कागदपत्रांसह चौघांना अटक

Nashik Crime : बोगस कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदारांना हजर करीत जामीन मिळवून देणारी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर-जिल्ह्यामध्ये विविध पक्षांच्या नेत्यांच्या सभा होत असल्याने या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, शहरातील हॉटेल्स, लॉजेसची तपासणी करीत असताना, विविध गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयातून जामीन मिळवून देण्यासाठी बोगस कागदपत्रे तयार करून बोगस जामीनदारांना हजर करीत जामीन मिळवून देणारी टोळीच पोलिसांच्या हाती लागली आहे. ( police caught gang that produce fake documents and produced bogus guarantors to get bail )

नाशिकरोड पोलिस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाने या टोळीला जेरबंद केले असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवदेश नारायण रामाधर उपाध्याय (४१, रा. आडगाव), नितीन नाथा महाले (३८), अरुण पंजाबराव गरुड (४५), सचिन कैलास शिरसाठ (३८, सर्व रा. नाशिकरोड) अशी संशयितांची नावे आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून शहरातील हॉटेल्स, ढाबे, लॉजेस, रेल्वेस्थानक, बसस्थानक याठिकाणी करडी नजर ठेवून तपासणी केली जात आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे अंमलदार संदीप पवार, हेमंत मेढे, राहुल मेहेंदळे हे मंगळवारी (ता. १४) नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल्स व लॉजेसची तपासणी करीत होते.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळील साई लॉज याठिकाणी पथकाकडून तपासणी सुरू असताना, एका रुममध्ये थांबलेल्या चौघांची चौकशी सुरू होती. त्यावेळी पोलिसांना त्यांच्याकडील कागदपत्रांवरून संशय आला. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी करीत त्यांच्याकडील कागदपत्रांची व सामानाची झडती घेतली असता, धक्कादायक कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागले.

संशयित उपाध्याय याच्याकडे स्वत:चा फोटो असलेले मात्र वेगवेगळ्या नावांचे तीन आधारकार्डसह अनेक बनावट कागदपत्रे सापडली. तर अन्य संशयितांकडेही बनावट रेशनकार्ड, महसुल विभागाचे बनावट शिक्के असे साहित्य मिळून आले. कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी संशयित राकेश बाळू जाधव, प्रमोद प्रल्हाद नार्वेकर, दविद लमूवेल गायकवाड याच्याकडून बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड तयार करून घेतल्याचे सांगितले.

याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी हे तपास करीत आहेत.

बोगस जामीनदारीचा धंदा

न्यायालयांमध्ये बोगस जामीनदार उभे करून आरोपींना जामीन मिळवून दिला जातो, अशी ओरड नेहमीच होत असते. परंतु अशी बोगस जामीनदारांची टोळी पहिल्यांदाच जेरबंद झाली आहे. संशयित हे बनावट आधारकार्डसह रेशनकार्ड व अन्य कागदपत्रे फौजदारी खटल्यातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी न्यायालयात बोगस नावाने हजर केले जातात. यामागे मोठे रॅकेट न्यायालयात चालते असे नेहमीच बोलले जाते. यात वकिली व्यवसाय करणार्यांचा मोठा हात असल्याचे सांगितले जाते. या निमित्ताने ही बाब उघड झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT