BIke Riders esakal
नाशिक

Nashik News : 'धूमस्टाईल' Bike Ridingवर आयुक्तांची करडी नजर! गाड्यांच्या मालकांवर होणार गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ‘धूमस्टाईल’ बाईक रायडिंग अन्‌ कर्णकर्कश आवाजाचे मॉडिफिकेशन केलेल्या सायलेंसरच्या धडकी भरविणाऱ्या आवाजाच्या दुचाकी विरोधात शहर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी याबाबत आयुक्तालय हद्दीतील पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरत थेट कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे धूमस्टाईल बाईक रायडर्स अन्‌ सायलेंसरमध्ये मॉडिफिकेशन केलेल्या दुचाकी चालकांचे धाबे दणाणले आहे. (nashik police Commissioner eyes on Bike Riding Crimes filed against owners of bike with modified silencer Nashik News)

धूमस्टाईलने भरधाव वेगात धावणाऱ्या आणि कर्णकर्कश आवाज करणाऱ्या स्पोर्ट्स बाईक बाजारात दाखल झाल्या आहेत. या स्पोर्ट्स बाईक अत्यंत महागड्या असल्याने त्या काही मोजक्याच युवकांकडे आहेत. शहरातील असेच काही स्पोर्ट्स बाईक चालविणारे बाईक रायडर्स रात्री मायको सर्कलकडून त्र्यंबक रोडने सातपूर गावाच्या दिशेने धूमस्टाईल बाईक राईड करतात.

असेच प्रकार कॉलेज रोड, गंगापूर रोड, दिंडोरी रोड यासह सिडको, सातपूर, अंबड, पंचवटी, नाशिक रोड या उपनगरी भागात भरधाव वेगात आवाज करीत धावत सुटतात. या बाईकच्या आवाजाने वाहन चालविणाऱ्या चालकांमध्ये मात्र भितीचे धडकीच भरते. अत्यंत भरधाव वेगात हे बाईकस्वार दुचाक्या तिरक्या करीत सुसाट वेगात सुटल्याने आजूबाजूच्या वाहनचालकांमध्ये अक्षरश: धडकीच भरते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

तसेच, रहिवासी परिसरातूनही रात्री कर्णकर्कश आवाज करीत धावतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास होतो. याबाबत काही जागरूक नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारीही केल्या, परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती. दरम्यान नवनियुक्त आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निदर्शनास सदर बाब आल्याने त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना धारेवर धरत बाईक रायडर्सवर थेट कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत.

पुन्हा तोच बाईक रायडर कारवाईत सापडला तर त्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे बाईक रायडर्सचे धाबे दणाणले असून शहरभर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे.

"नियम सर्वांसाठी समान आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. जर कोणी दुचाकीच्या सायलेंसरमध्ये मॉडिफिकेशन करून आवाज करीत राईड करीत असेल तर त्याविरोधात पोलिस कठोर कारवाई करतील. सर्वसामान्यांना त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घेणे गरजेचे आहे." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त, नाशिक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

SCROLL FOR NEXT