Police checking vehicles on Trimbakeshwar Main Road on Sunday esakal
नाशिक

Nashik Pahine Waterfall : मद्यपींना पोलिसांचा दणका; पहिने येथे कडेकोट बंदोबस्त : मद्य जप्त

Pahine Waterfall : पावसाची रिमझिम अन्‌ निसर्गाच्या सान्निध्यात मद्याचे दोन घोट रिचविण्यासाठी पहिने परिसरात आलेल्यांना रविवारी (ता. २८) ग्रामीण पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Pahine Waterfall : पावसाची रिमझिम अन्‌ निसर्गाच्या सान्निध्यात मद्याचे दोन घोट रिचविण्यासाठी पहिने परिसरात आलेल्यांना रविवारी (ता. २८) ग्रामीण पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागले. त्र्यंबक रोडवरील पहिने फाट्यापासूनच ग्रामीण पोलीसांची नाकाबंदी करीत वाहनांच्या तपासणीत सापडलेल्या मद्याच्या बाटल्या पर्यटनासाठी आलेल्यासमोरच फोडल्या. (Police crackdown on drunkards strict security at Pahine )

पोलिसांच्या या कारवाईमुळे अनेकांना काढता पाय घ्यावा लागला. पुण्यातील लोणावळा परिसरात पावसाच्या ओढ्यात पर्यटनाचा आनंद घेताना एकाच कुटूंबियांतील पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचना जारी करीत, जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनाच्या स्थळी चोख पोलीस बंदोबस्तासह मद्यपी पर्यटकांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते.

त्र्यंबक रोडवरील पहिने येथील ओढ्या-नाल्यासह पाऊस अन्‌ निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी नाशिककरांसह पर्यटक विकेण्डला धाव घेतात. पहिने परिसरात पावसाची रिपरिप सुरू असल्याने रविवारी पर्यटकांची लक्षणीय गर्दी केली. याचवेळी काही टवाळखोर व हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी ग्रामीण पोलीसांच्या त्र्यंबकेश्वर आणि वाडिवर्हे पोलीस ठाण्याकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.

पहिने फाट्यावरच त्र्यंबक पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनांची कसून तपासणी केली जात होती. यात काही वाहनांमध्ये मद्याच्या बाटल्या पोलिसांच्या हाती लागताच, पोलिसांनी त्या जप्त करीत त्यांच्यासमोर रस्त्यालगत फोडून त्या नष्ट केल्या. पोलिसांची कारवाई पाहून काही टवाळखोर व हुल्लडबाजांनी पहिनेकडे जाण्याचे टाळल्याचे दिसून आले.

गेल्या विकेण्डला याच ठिकाणी दोन गटात फ्रि-स्टाईल राडा झाला होता. त्यामुळे पोलीस टीकेचे धनी झाले होते. तर दोन आठवड्यांपूर्वी हुल्लडबाजा व टवाळखोरांनी गर्दी करीत भररस्त्यावर मद्याच्या बाटल्या नाचवित रेनडान्स केला होता. तर पोलिसांकडून बघ्याची भूमिका होती. मात्र यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्तासह कारवाईचा दंडुका उगारल्याने टवाळखोर-हुल्लडबाजांना काढता पाय घ्यावा लागल्याचे दिसून आले.

वर्षासहलीचा आनंद

पहिने भोवती असलेल्या डोंगरदर्यातून कोसळणारे धबधबे अन्‌ वाहणारे ओढे-नाल्यांचा मनमोहक निसर्ग सौदर्यांचा आनंद लुटण्यासाठी रविवारी मुलाबाळांसह कुटूंबियांनी पहिने गाठले. ओढ्याच्या पाण्यात ओलेचिंब होत वर्षासहलीचा मनमुराद आनंद पर्यटक घेत होते. तर धोकादायक ठिकाणी पोलीसांचा बंदोबस्त होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT