drunk and driving crime esakal
नाशिक

Nashik Police : पावसामुळे पोलिसांना ‘ड्रंक ॲन्ड ड्राइव्ह’चा विसर; तळीरामांची मात्र वाइन शॉपबाहेर गर्दी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : सोमवार (ता. ५)पासून श्रावणमासाला प्रारंभ होत असल्याने रविवारी (ता.४) दिवसभर शहरातील वाईइन शॉपबाहेर मद्यपी ग्राहकांची गर्दी दिसून आली. मात्र, दोन दिवसांपासून ड्रंक ॲन्ड ड्राइव्हसाठी सज्ज असलेल्या पोलिसांना कारवाईसाठी एकही तळीराम सापडला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यंदा आषाढी अमावास्या (गटारी) रविवारी आल्याने तळीरामांना दोन दिवस ओली पार्टी करण्याची आयतीच संधी मिळाली होती. (Police Due to rain police forgot about Drunk and Drive)

तर दडी मारलेल्या पावसानेही जोरदार हजेरी लावल्याने तळीरामांना चांगलेच वातावरण तयार झाले होते. यामुळे शनिवारी, रविवारी दिवसभर मांसाहाराची दुकाने व वाइन शॉपबाहेर ग्राहकांची गर्दी दिसून आली, तर बिअर बार, पार्सल पॉइंट असलेल्या ढाबे, हॉटेलमध्येही ग्राहकांची रेलचेल होती. दरम्यान, शनिवारी, रविवारी मद्यपी वाहनचालकांविरोधात ड्रंक ॲन्ड ड्राइव्हची कारवाई करण्यासाठी शहर पोलिसांनी नाकाबंदीचे जय्यत नियोजन केले होते. (latest marathi news)

परंतु शनिवारी (ता. ३) आयुक्तालय हद्दीत अवघ्या तीन ड्रंक ॲन्ड ड्राइव्हची कारवाई झाल्याचे समोर आले आहे. पावसामुळे तळीरामांनी घरातच ओली पार्टी केली की पोलिसांनीच नाकाबंदी केली नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत शहरात नाकाबंदी करीत ड्रंक ॲन्ड ड्राइव्हच्या कारवाईचे नियोजन वाहतूक शाखा व पोलिस ठाणेनिहाय केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: विधानसभा निवडणुकीत अजितदादा 'एम' कार्ड खेळणार; चार उमेदवारांची नावेही समोर

Seema Deo: सुनेसोबत अशा वागायच्या सीमा देव; सासूबाईंबद्दल बोलताना स्मिता देव म्हणाल्या- त्या घरी असल्या की..

iPhone 16 Home Delivery : आयफोन 16 घेण्यासाठी रांगेत कशाला थांबताय? घरपोच मिळणार फक्त 20 मिनिटांत,अशी करा ऑर्डर

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : महिलेने विनयभंग केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिल्याने जेष्ठ नागरिकाने संपवले जीवन

SCROLL FOR NEXT