Nashik Police Recruitment esakal
नाशिक

Nashik Police Recruitment: मुसळधार पावसानंतरही ‘भरती’ मात्र सुरळीत! सिंथेटिक ट्रॅकवर भरतीचे नियोजन यशस्वी; उमेदवारांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : ऐनपावसाळ्यामध्ये राज्यात पोलीस भरतीसाठीची मैदानी चाचणी घेतली जात असल्यावरून टीका होते आहे. परंतु यास नाशिक पोलीस आयुक्तालय व ग्रामीण पोलीस दल अपवाद ठरले आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस होऊनही भरतीच्या मैदानी चाचणीत व्यत्यय आलेला नाही.

शहर आयुक्तालयाने आंतरराष्ट्रीय पातळीवरील सिंथेट्रिक ट्रॅकच्या धर्तीवर बनविण्यात आलेल्या पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअमवरील सिंथेटिक ट्रॅकवर धावण्याच्या चाचण्या घेतल्या आहेत. तरीही पावसाचा जोर वाढल्यास अतिरिक्त तारखांचेही नियोजन पोलिस प्रशासनाने केलेले आहे. (Nashik Police Recruitment on synthetic track)

शहरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम ते मुसळधार स्वरुपाचा पाऊस सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी पावसामुळे मैदानांची अवस्था वाईट झाल्याचे बोलले जाते. त्यावरून टीकाही होते आहे. तर, नाशिक पोलीस आयुक्तालयाने गेल्या १९ तारखेपासून भरतीसाठी मैदानी चाचणी मीनाताई ठाकरे स्टेडिअमवरील सिंथेटिक ट्रॅकवर सुरू केलेली आहे.

याठिकाणी पाऊस झाला तरी चिखल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे धावण्याच्या १०० मी आणि १६०० मी. चाचण्या वेळेत व यशस्वीरित्या होत आहेत. त्यामुळे पोलिस प्रशासनाने अद्याप कोणताही बदल केलेला नाही. शहर पोलिसांची मैदानी चाचणी सुरु असलेल्या ठिकाणी चिखल फार नसल्याने व्यत्यय आलेला नाही.

असे असले पावसामुळे सिंथेटिक ट्रॅकवरुन धावताना अडचणी येत असल्याचा दावा काही उमेदवारांनी केला आहे. मात्र, पोलिस प्रशासनाने पाऊस सुरु असताना उमेदवारांची मैदानी चाचणी घेतलेली नाही. मध्यम स्वरुपातील पावसावेळी भरती काहीवेळ थांबवून पुन्हा नियमित सुरू केली जाते. मात्र पावसाचा जोर वाढल्यास मैदानी चाचणीसाठी अतिरिक्त तारखाही राखून ठेवल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. (latest marathi news)

गुणवत्ता यादीकडे लक्ष

ग्रामीण पोलिस दलात ३२ जागांसाठी सुमारे ३ हजार २२५ उमेदवारांचे अर्ज केले होते. त्यानुसार १९ ते २२ जून यादरम्यान मैदानी चाचणी घेतली असता, चाचणीसाठी ३ हजार १६० उमेदवारापैकी १ हजार ८१८ उमेदवारांनी हजेरी लावली. त्यापैकी छाती, उंची व इतर निकषांअंती २५३ उमेदवार अपात्र तर एकाने स्वच्छेने माघार घेतली.

पात्र ठरलेल्यांचे १६०० मीटर धावण्याची चाचणी डांबरी रस्त्यावर तर १०० मीटर धावण्यासाठी ‘वॉटर प्रूफ’ मंडप उभारला होता. उमेदवारांची संख्या कमी असल्याने मैदानी चाचणी शनिवारीच (ता. २२) संपली असून उमेदवारांचे लक्ष आता गुणवत्ता यादीकडे लागले आहे.

"शहर आयुक्तालयातर्फे सुरू असलेल्या मैदानी चाचणीत पावसात व्यत्यय आलेला नाही. भरती प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. पाऊस असल्यास चाचणी थांबविली जाते आणि उघडीप मिळाल्यावर पुन्हा सुरू होते."- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, शहर मुख्यालय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे पात्रता? शरद पवारांच्या जवळच्या नेत्यानं सांगितलं गणित

BSNL Sim Card Online : घरबसल्या 90 मिनिटांत मिळणार BSNL 4G आणि 5G सिमकार्ड; जाणून घ्या ऑनलाईन ऑर्डरची सोपी प्रक्रिया

मुंबईतील आगीत 7 जणांचा मृत्यू ते तुतारीची उमेदवारी मिळवण्यासाठी काय आहे निकष? सकाळी 9 पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

काय ते स्वित्झर्लंड अन् काय ती उधारी... CM शिंदेंच्या दौऱ्याची करोडोंची थकबाकी, कंपनीने पाठवली कायदेशीर नोटीस

Pune Accident: पीएमपीएमएलच्या बसचे ब्रेक अचानक झाले निकामी, त्यानंतर जे घडलं ते...video viral

SCROLL FOR NEXT