Nashik Police Recruitment esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : 3 अपत्यामुळे शिपाई पदासाठी ठरला अपात्र

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Recruitment : नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेची अंतिम टप्प्यातील कागदपत्र पडताळणीमध्ये एका उमेदवाराला अपात्र ठरविण्यात आले आहे. माजी सैनिक कोट्यातून निवड झालेल्या या उमेदवारास तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास अपात्र ठरविण्यात आले, तर तिघांनी कागदपत्रे पडताळणीला दांडी मारली. तसेच अनुकंपेच्या ३९ उमेदवारांसह ११४ असे १५३ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली असून, त्यांची वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे. (Recruitment Disqualified for constable post due to 3 children )

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रत्यक्ष पडताळणीच्या ठिकाणी कामकाजाची पाहणी केली. मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, प्रशासनाच्या सहायक आयुक्त संगीता निकम यांच्या पथकाने उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली. मैदानी व लेखी चाचणीवेळी घेण्यात आलेली बायोमेट्रिक चाचणी आणि पडताळणीसाठी आलेल्या उमेदवाराची बायोमेट्रिक चाचणी जुळत असल्याचीही चाचणी केल्यानंतरच उमेदवाराच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली.

यामध्ये ११८ पैकी ११५ पडताळणीला उपस्थित होते, तर तिघांनी दांडी मारली. माजी सैनिक कोट्यातील उमेदवार कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरले. तीन अपत्य असल्याने ते अपात्र ठरले आहेत. उर्वरित तिघांच्या कागदपत्रांची पडताळणीसाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यापासून शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी सुमारे सात हजार उमेदवारांनी अर्ज केले असता, मैदानी चाचणीतून ४ हजार ३७४ उमेदवार पात्र ठरले होते. (latest marathi news)

यानुसार कटऑफ लावून लेखी परीक्षेसाठी १ हजार १९७ उमेदवार पात्र ठरले होते. लेखी परीक्षेनंतर मैदानी चाचणी व लेखीचे गुण एकत्रित करून अंतिम गुणवत्ता यादी जारी करण्यात आली. प्रवर्गानिहाय सदरची यादी आयुक्तालयाने प्रसिद्ध करीत त्यावर हरकतीही मागविल्या होत्या. त्यानंतर अंतिम यादी जारी करीत ११८ जणांना मंगळवारी (ता. १६) पोलिस मुख्यालयाच्या भीष्मराज बाम सभागृहात पाचारण करीत कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली.

अनुकंपाचे ३९ हजर

दरम्यान, अनुकंपा तत्त्वावरील ३९ वारसांच्या कागदपत्रांची अंतिम पडताळणी करण्यात आली. ११४ आणि ३९ असे १५३ उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची निवड करण्यात आली आहे. या निवड झालेल्यांची वैद्यकीय चाचणी होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसर, कोथरूड, कसबा, शिवाजीनगर, पर्वती या जागांवर मनसे उमेदवार देणार

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT