Nashik Police Recruitment : पोलीस भरती प्रक्रियेमध्ये आर्थिक दूर्बल घटकातून (इडब्ल्युएस) उमेदवारी अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. तर, उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी अपर पोलीस महासंचालकांनी आदेश दिले आहेत. यामुळे शहर व ग्रामीण पोलीस दलातील इडब्ल्युएस घटकातून अर्ज केलेल्या मराठा उमेदवारांच्या पोलीस भरतीच्या प्रक्रियेला सध्या तरी ब्रेक लागला आहे. (Nashik Police Recruitment EWS Selection Still Postponed)
महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. यात काही जिल्ह्यात अद्यापही प्रक्रिया सुरू आहे तर नाशिक शहर व ग्रामीणची भरतीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मैदानी चाचणी होऊन लेखी परीक्षाही झाली. त्यानुसार अंतिम निवड यादीही जाहीर झाली.
मात्र, या दरम्यान मराठा उमेदवारांनी आर्थिक दूर्बल घटकातून (इडब्ल्युएस) अर्ज केले आहेत. त्यांना सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागासवर्ग (एसइबीसी), इतर मागासवर्ग (ओबीसी) वा खुले गटातून अर्ज करण्यासंदर्भात हमीपत्र मागण्यात आले. मात्र या उमेदवारांनी त्यास नकार दिल्याने त्यासंदर्भातील मार्गदर्शन अपर महासंचालकांकडे प्रलंबित आहे. (latest marathi news)
नाशिक शहर आयुक्तालयाच्या निवड यादीतील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील ६ मराठा उमेदवारांपैकी चौघांनी हमीपत्र देण्यास नकार दिला. तर नाशिक ग्रामीण पोलिस दलात इडब्ल्यूएसमधून उत्तीर्ण झालेल्या एका महिला उमेदवाराची निवड रद्द होण्याची शक्यता आहे.
यासंदर्भात अपर पोलीस महासंचालकांनी इडब्ल्युएस घटकातून अर्ज केलेल्या उमेदवारांची उमेदवारी रद्द न करता ती प्रकरणे तात्पुरती स्थगित ठेवावी. यासंदर्भात पुढील आदेशाची वाट पहावी. तसेच, उर्वरित उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू ठेवावी असे कळविण्यात आलेले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.