Candidates during the field test for the post of police constable by City Police Commissionerate. esakal
नाशिक

Nashik Police Recruitment : मैदानी चाचणीला महिलांची दमछाक! तृतीयपंथी उमेदवारांची दांडी

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडिअम येथे सुरू असलेल्या शहर आयुक्तालयाच्या रिक्त शिपाई पदासाठीची भरतीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केला असता, शनिवारी (ता. २९) त्यांची मैदानी चाचणी होती. मात्र ते चाचणीला आलेच नाही. तर, अखेरच्या दिवशी महिला उमेदवारांना मात्र मैदानी चाचणी देताना चांगलीच दमछाक झाल्याचे पहावयास मिळाले. (Police Recruitment Field test of women tired)

शहर पोलिस आयुक्तालयातील रिक्त ११८ शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी गेल्या १९ तारखेपासून सुरू आहे. यासाठी ५ हजार ५९० पुरुष, दोन हजार १२५ महिला व दोन तृतीयपंथी उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत. मैदानी चाचणीचा शनिवारी (ता. २९) अखेरचा दिवस होता. तर आजच्या दिवशी दोघा तृतीयपंथी उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी पाचारण करण्यात आले होते. परंतु दोघाही उमेदवारांनी चाचणीला गैरहजेरी लावली आहे.

महिला उमेदवारांची दमछाक

शनिवारी (ता२९) मैदानी चाचणीसाठी महिला उमेदवारांनी हजेरी लावली. त्यांची बायोमॅट्रिक हजेरी व कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उंची मोजमाप घेण्यात आले. त्यानंतर १०० मीटर व ८०० मीटर धावण्याची चाचणी घेण्यात आली.

बहुतांशी महिला उमेदवारांना १०० मीटर धावण्यासाठीही दमछाक झाली. तर ८०० मीटर धावताना तर अनेक महिला उमेदवारांनी तर अखेरच्या टप्प्यात पायीच चालत अंतर पार केल्याचे पहावयास मिळाले. त्यातही ज्यांनी नियमित सराव केला अशा महिला उमेदवारांनी मात्र सहज हे अंतर पार केल्याचे पहावयास मिळाले. (latest marathi news)

३६६ ठरले पात्र

शनिवारी, मैदानी चाचणीसाठी ६६१ उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. यात काही कारणास्तव १३ पुरुष, महिला व माजी सैनिकांचा समावेश होता. ६६१ पैकी ४२० उमेदवार हजर होते तर २४१ गैरहजर राहिले. ४२० पैकी ३६६ उमेदवार हे मैदानी चाचणीत पात्र ठरले. ५४ उमेदवार उंचीमध्ये अपात्र ठरले.

आता प्रतिक्षा लेखी परिक्षेची

ग्रामीण पोलिस दलाची मैदानी चाचणी २२ तारखेलाच पूर्ण झाली. तर शहराची शनिवारी अखेरचा दिवस असला तर गैरहजर असलेल्यांना रविवारी (ता. ३०) अखेरची संधी आयुक्तालयाने उपलब्ध करून दिली आहे. यावेळी गैरहजर राहिलेले महिला-पुरुष उमेदवारांसह तृतीयपंथी चाचणीसाठी येण्याची शक्यता आहे. मात्र, आता मैदानी चाचणीत पात्र ठरलेल्यांना लेखी परीक्षेची प्रतिक्षा लागून आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यानंतर लेखी परीक्षा होण्याची शक्यता आहे.

"ज्यांना मैदानी चाचणीला काही कारणास्तव येता आलेले नाही, त्यांना रविवारी अखेरची संधी आहे. आत्तापर्यंतची मैदानी चाचणी सुरळीत पार पडली आहे. लेखी परीक्षेसंदर्भात अद्याप सूचना आलेली नाही." - संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त, नाशिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT