Jewellery Case esakal
नाशिक

नाशिक : चोरीस गेलेले 95 हजाराचे दागिने पोलिसांनी केले परत

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंद घराचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी (Jewellery Theft) करणाऱ्यास अटक करून न्यायालयाच्या आदेशाने दागिने सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना (Assistant Commissioner Dipali Khanna) यांच्या हस्ते फिर्यादीला परत देण्यात आले.

१७ ऑक्टोबर २०२१ रोजी जनसिंग मोहन ससाणे ( ५१, रा. नाशिक ) यांच्या बंद घराचे अज्ञात व्यक्तीने कुलूप तोडुन त्याद्वारे घरात प्रवेश करून घरातील ९५,०००/- रू. किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी भद्रकाली (Bhadrakali) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून व.पो.नी. दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशोध पथकाच्या पोलीसांना (Crime Squad) मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व तांत्रिक दृष्ट्या शिवाजी चौक, कथडा, जुने नाशिक, नाशिक येथे सापळा रचुन संशयित हानी फुलमचंद बरेलीकर, ( २८ , रा. संतरोहिदास समाज मंदीराजवळ, शिवाजीचौक, भद्रकाली नाशिक ), किशोर बाबुराव वाकोडे, ( २० , रा. भगवतीनगर, कोळीवाडा, भद्रकाली नाशिक ) यास ताब्यात घेतले. त्यांची विचारपुस केली असता त्यांच्या सोबत त्यांचे अजुन दोन साथीदार सागर टाक ( रा. नाशिक) व एक विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे संशयितांनी सांगितले.

असा होता मुद्देमाल

संशयितांकडून गुन्हयातील मुद्देमाल ७५ हजार रुपये किंमतीचे ०५ किलो चांदीचे मिश्रीत धातु असलेले दागिने, त्यात देवीचे मुकूट, छत्री व कमरपट्टा, १२ हजार रुपये किंमतीचे ०१ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स, २ ग्रम वजनाची एक सोन्याची तार असे एकुण ८७ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. न्यायालयाच्या आदेशाने सदर मुद्देमाल सहाय्यक आयुक्त दिपाली खन्ना ,भद्रकाली पोलीस ठाण्याचे व.पो.नी. दत्ता पवार यांच्या उपस्थित ससाणे यांना परत देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT