Assistant Commissioner Shekhar Deshmukh, Police Inspector Jairam Paigude stopped MLA Hiraman Khoskar at the entrance of Ambad Warehouse counting center for lack of identity card. esakal
नाशिक

Nashik News : आमदार खोसकरांना रोखले! कडेकोट नाकाबंदी; जेवणाच्या पार्सलवरून बाचाबाची

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक, दिंडोरी मतदार संघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील वेअर हाऊस येथे होत असताना, येथील प्रवेशद्वारावर ओळखपत्र असणाऱ्यांना आत प्रवेश दिला जात असताना, काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारला. त्यावरून बाचाबाचीही झाली.

परंतु शहर गुन्हेशाखेच्या विशेष पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी त्यांना प्रवेश दिला नाही. दरम्यान, दिंडोरी मतमोजणी केंद्रातील कार्यकर्त्यांना जेवणाचे पार्सल नेण्यावरून दोन गटात बाचाबाची झाली. त्यावेळीही पोलिसांनी सुरुवातीला समज दिल्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना केंद्राबाहेर काढले. (police stopped MLA Khoskar from entering vote counting room)

अंबड वेअर हाऊस येथे दुपारनंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याने समर्थक नेत्यांनीही मतमोजणी केंद्राकडे धाव घेतली. माजी आमदार वसंत गिते, शिवसेवा उबाठा गटाचे सुधाकर बडगुजर, दत्ता गायकवाड यांनी मतमोजणी केंद्र येथे आले. त्यांच्याकडे ओळखपत्र असल्याने त्यांना प्रवेश देण्यात आला.

तर दुपारी चारच्या सुमारास काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर, संपत सकाळे हेदेखील मतमोजणी केंद्रावर पोहोचले. परंतु त्यांच्याकडे निवडणूक आयोगाने वितरित केलेले ओळखपत्र नसल्याने प्रवेशदवारावर असलेले पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी रोखले.

त्यावेळी आमदार खोसकर यांनी पायगुडे यांच्याशी वाद घातला असता, त्यावेळी सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनीही आमदार खोसकर यांना समजून घालण्याचा प्रयत्न केला. ओळखपत्राशिवाय केंद्रात प्रवेश नाकारल्याने आमदार खोसकर यांना काढता पाय घ्यावा लागला.

दरम्यान, अंबड वेअर हाऊस येथे सकाळी सात वाजेपासून वेअर हाउसमध्ये निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रवेश देण्यास सुरुवात झाली. नाशिक, दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी कक्षाकडे जाण्यासाठी स्वतंत्र रांगा करण्यात आल्या होत्या.

‘मेटल डिटेक्टर’मधून तपासणी करुन प्रतिनिधींना आतमध्ये कसून तपासणी केल्यानंतरच सोडले जात होते. सकाळी साडेअकरानंतर मतांचे आकडे समोर आल्यावर उमेदवारांच्या प्रतिनिधींची चुळबूळ सुरु झाली. तसेच, बाहेरून येणाऱ्यांचीही संख्या वाढली. (latest marathi news)

यामुळे सतत आत-बाहेर करणाऱ्या प्रतिनिधींना पोलिसांनी सुरुवातीला समज देत सूचना केल्या. दुपारनंतर, नाशिकमधून महाविकास आघाडीचे राजाभाऊ वाजे तर दिंडोरीतून भास्कर भगरे यांनी विजयाच्या दिशेने आगेकूच केल्याने समर्थकांची गर्दीही होऊ लागली.

त्यावेळीही पोलिसांनी सूचना करुनही प्रतिनिधी ऐकत नसल्याने पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, सहायक निरीक्षक योगेश पाटील समज दिली. तसेच वारंवार पोलिसांनी तेच काम करायचे का, असा सवाल करीत गर्दी न करण्याची सूचना केली.

जेवणाच्या पार्सलवरून बाचाबाची

दिंडोरी मतमोजणी केंद्रातील उमेदवारांच्या प्रतिनिधींसाठी जेवणाचे पार्सल नेण्यावरून दोन गटातील कार्यकर्त्यांमध्ये वाद सुरू झाला. त्यावेळी तेथे नियुक्तीला असलेल्या पोलिसांनी त्यांना समज दिली. परंतु त्यांच्या वाद न थांबता वाढत गेला. तेव्हा पोलिसांनी वाद घालणाऱ्या कार्यकर्त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT