Loksabha Election 2024 & Police esakal
नाशिक

Nashik Police: आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांची कठोरतेने अंमलबजावणी! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा

Nashik News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सार्वत्रिक निवडणूका निर्विघ्न पार पाडण्याची मुख्य जबाबदारी पोलिसांवरच असते. पोलिसांनी अलर्ट मोडवर राहून अवैध धंदे, सराईत गुन्हेगारांविरोधात विविध कलमान्वये कारवाई करणे, मतदारांना ना-ना प्रकारे प्रलोभने दाखवून मतदानावेळी गैरप्रकाराची शक्यता असते.

अशावेळी पोलीस अलर्ट राहून सार्वत्रिक निवडणूक काळातील गैरप्रकार व घटनांना वेळीच प्रतिबंध करावा, त्यासाठी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे अंमलबजावणी करीत कारवाई करावी, अशा सूचना ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेत काकासाहेब डोळे यांनी केल्या. (Nashik code of conduct guidelines workshop for officers in wake of loksabha elections 2024 marathi news)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाच्या वतीने ‘सार्वत्रिक निवडणूक व्यवस्थापन व बंदोबस्त’ या विषयावर आधारित शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या प्रशिक्षण कार्यशाळेला काकासाहेब डोळे यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.

तर दुपारच्या सत्रामध्ये नाशिक जिल्हा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण मोनिका राऊत, चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त नितीन जाधव, डॉ. सचिन बारी, शेखर देशमुख, डॉ. सीताराम कोल्हे, अंबादास भुसारे यांच्यासह पोलीस ठाण्यांचे प्रभारी पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखांचे प्रभारी पोलीस निरीक्षक, विशेष शाखेतील गोपनीय पथकाचे अंमलदार उपस्थित होते.

निवडणूक काळामध्ये मोठ्याप्रमाणात अवैध मद्याची तस्करी केली जाते. अंमलीपदार्थांचाही वापर केला जातो. या काळात पोलिसांनी आपआपल्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात गुन्हे दाखल करावे. निवडणूका असल्याने विविध राजकीय पक्षांच्या सभा, रॅली, प्रचार फेर्यांचा जोर असतो.

अशावेळी पोलिसांकडून परवानगी देताना वेळेची बंधने घालून द्यावीत. परवानाधारकांकडील शस्त्रे जमा करून घ्यावीत, रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करीत हद्दपारी, स्थानबदधतेच्या अधिकाधिक कारवाई करावी, दिवसरात्र पेट्रोलिंग करावी, निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी कठोरतेने करावी, तसेच यानुसार दररोजचा कारवायांचा अहवाल आयुक्तालयास देणे बंधनकारक असणार आहे, असेही यावेळी मार्गदर्शन करताना सांगितले.  (latest marathi news)

पोलीस ठाणेनिहाय प्रशिक्षण

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळेनंतर आता पोलीस ठाणेनिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस अकादमीने सविस्तर मॉड्युल तयार केले आहे. पंचवटी, सरकारवाडा, अंबड आणि नाशिकरोड अशा चार विभागातील पोलीस अधिकारी, अंमलदारांना पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, किरणकुमार चव्हाण, मोनिका राऊत हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ अधिकार्यांकडून मॉड्युलनुसार मार्गदर्शन केले जाणार आहे.

प्रशिक्षणांतील ठळक मुद्दे

- अवैध धंदे, मद्य, अंमलीपदार्थविरोधी कारवाया

- अवैध हत्यारांविरोधात कारवाई

- परवानाधारकांचे शस्त्रांचे संकलन

- नाकाबंदी, बेरिकेटींग करून तपासणी

- रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

- वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावी बुथ व्हिजीट

- पोलीस ठाणेनिहाय दिवस-रात्र पेट्रोलिंग

- मुख्य नेत्यांच्या दौर्याच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटॅलिटीची सुविधा

- सभांचे व्हिडिओग्रॉफी करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT