नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या ‘एक्स’ या ट्विटर हॅण्डलवर नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नाशिककरांनी केलेल्या सूचनांनुसार पोलिसांकडून तत्काळ कारवाई होते आहे.
परंतु या हॅण्डलला असलेली मर्यादा लक्षात घेता, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आयुक्तालयाचा व्हॉटसॲप क्रमांक ९९२३३२३३११ नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिला आहे.
या व्हॉटसॲप क्रमांकावर नाशिककर पोलिसिंगबाबत थेट अभिप्राय व सूचना करू शकणार आहेत. त्यामुळे शहर पोलिसांनाही व्हॉटसॲपच्या माध्यमातून अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहोचता येणार आहे. (Nashik Police takes another step forward on Social Media app whatsapp 90 notifications on first day by commissioner)
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पदभार घेतल्यापासून नाशिक पोलीस सोशल मीडियावर झळकू लागले आहे. विशेषत: शहर आयुक्तालयाच्या ‘एक्स’ या ट्विटर हॅण्डलला सुमारे ५० हजार फॉलोअर्स आहेत.
तर, आयुक्तांच्या निर्देशानुसार शहर पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाई व कामगिरीची माहिती दिली जाते आहे. यावर नाशिककरांकडूनही सूचना केल्या जात आहेत. त्या सूचनांना शहर पोलिसांकडूनही तात्काळ प्रतिसाद मिळतो आहे.
परंतु या हॅण्डलला असलेली मर्यादा लक्षात घेत आयुक्त कर्णिक यांनी अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहोचण्यासाठी व त्यांच्या सूचना-अभिप्राय प्राप्त होण्यासाठी व्हॉटसॲपचा पर्याय निवडला आहे.
आयुक्तालयाने नव्याने ९९२३३२३३११ हा व्हॉटसॲप क्रमांक नाशिककरांसाठी उपलब्ध करून दिला आहे. यावर नाशिककर नाशिक शहर पोलिसांना त्यांच्या कामासंदर्भात अभिप्राय व सूचना करू शकणार आहेत.
या सूचनांनुसार पोलिसिंग करणे शहर पोलिसांना सोपे होणार आहे. व्हॉटसॲपमुळे शहर पोलिसांना अधिकाधिक नाशिककरांपर्यंत पोहोचता येणे शक्य होणार आहे.
‘व्हॉटसॲप’वर प्रतिसाद
शहर पोलीस आयुक्तालयाने व्हॉटसॲप जारी केल्यानंतर बुधवारी (ता. २७) दुपारपर्यंत ९० सूचना, अभिप्राय प्राप्त झाले होते.
सायंकाळपर्यंत दीडशेपेक्षा जास्त सूचना, अभिप्राय नोंदविण्यात आले. यात प्रामुख्याने शहरातील वाहतुकीसंदर्भातील समस्या, तक्रारी व सूचनाच अधिक होत्या.
शहरातील टवाळखोरींसह वादावादी वा तक्रारींसंदर्भात ‘डायल ११२’ या क्रमांकावर संपर्क साधला जातो. ही सुविधा सुरूच राहणार आहे. तर, व्हॉटसॲप क्रमांक केवळ अभिप्राय व सूचनांसाठी आहे.
डायल ११२ वर संपर्क साधून तक्रार केल्यास तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहोचून कारवाई करतात. त्याचा नियमित आढावा पोलीस ठाणे आणि पोलीस आयुक्तालयाकडून घेतला जातो.
"नाशिक शहरातील नागरिकांना पोलिसिंगबाबत असलेल्या सूचना व अभिप्राय देण्यासाठीच व्हॉटसॲप क्रमांक सुरू करण्यात आलेला आहे. त्यावर नाशिककरांनी अधिकाधिक सूचना कराव्यात, जेणेकरून त्यानुसार पोलिसांना अंमल करणे शक्य होईल."
- संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त, नाशिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.