Navratri 2024  esakal
नाशिक

Navratri 2024 : गरबा, दांडिया आयोजनावर पोलिसांची राहणार करडी नजर; मर्यादेचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

Navratri 2024 : अवघ्या आठवडाभरावर नवरात्रोत्सव आला आहे. गरबा, दांडिया आयोजकांकडून वेगात तयारी सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अवघ्या आठवडाभरावर नवरात्रोत्सव आला आहे. गरबा, दांडिया आयोजकांकडून वेगात तयारी सुरू आहे. मात्र, दुसरीकडे गरबा-दांडियाचे आयोजन करणार्यांवर शहर पोलीसांची करडी नजर असणार आहे. डीजे, लेझर वापरण्यावर बंदी घातलेली आहेच, परंतु ध्वनीमर्यादेचे उल्लंघन केल्यास थेट कारवाईचा इशाराही पोलिस आयुक्तालयाने दिला आहे. नुकताच गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सणउत्सव साजरे झाले. गेल्यावेळी या सणांमध्ये डिजे आणि लेझर लाईटचा वापर करण्यात आला होता. (Police will keep watch on navratri festival in city )

यंदा मात्र दोन्ही सणात लेझर लाईट वापरण्यात आले नाहीत. तर काही मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. याप्रकरणी तीन मंडळांविरोधात गुन्हे दाखल झाले तर काहींनी ध्वनी मर्यादेचे पालन केल्याचा दावा पोलीसांनीच केला आहे. दरम्यान, अवघ्या आठवडाभरावर नवरात्रोत्सव आला आहे. नवरात्रोत्सवात तरुणाई गरबा-दांडियावर थिरकण्यासाठी उत्सुक असतील. त्यासाठी गरबा-दांडिया आयोजकांकडून जय्यत तयारीही सुरू आहे. काही आयोजकांनी परवानगीसाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला आहे. त्यावेळी पोलिसांकडून डीजे आणि लेझर लाईटचा वापर न करण्याच्या सूचना केल्या आहेत. (latest marathi news)

तसेच येत्या काही दिवसात पोलिसांकडून आयोजक, मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक घेऊन सविस्तर सूचना केल्या जाणार आहेत. तर, नवरात्रोत्सवात बहुतांश ठिकाणी लाॅन्स, हॉटेल्समध्येही गरबा-दांडियाचे आयोजन केले जाते. अशाठिकाणी परवानगी देतानाही पोलिसांनी वेळेचे बंधन पालन करण्याचे आदेश दिले आहेत. असे असले तरी नवरात्रोत्सवा पोलीसांकडून विशेष पथकामार्फत अशा ठिकाणांची धडक तपासणी मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे. यात उल्लंघन करणारे आयोजक, मंडळांवर कारवाईही केली जाण्याची शक्यता आहे.

हुल्लडबाजीला चाप

गरबा, दांडियाच्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात युवती, महिलांची उपस्थिती असते. अशावेळी हुल्लडबाजी करणार्यांकडून युवती-महिलांची छेडखानी करण्याची शक्यता असते. असे अनुचित प्रकार होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून दामिनी व निर्भया पथकांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. तसेच, नागरिकांनीही अशा टवाळखोरांविरोधात कारवाईसाठी डायल ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Gawli: विधानसभा निवडणुकांमध्ये अरुण गवळीला हवी होती रजा; अर्ज नाकारल्याने नागपूर खंडपीठात धाव

विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड प्रमाणेच मिळणार ‘अपार कार्ड’! शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबणार; कार्डमध्ये असणार विद्यार्थ्यांची ‘ही’ माहिती

Mumbai Crime: तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकराविरोधात गुन्हा, वाचा नक्की काय घडलं?

काँग्रेसचा बालेकिल्ला राखण्याचे प्रणिती शिंदेंसमोर आव्हान! सोलापूर ‘शहर मध्य’मध्ये चौरंगी लढत; ६० हजारांहून अधिक मते घेणाराच होईल आमदार, जाणून घ्या समिकरणे...

Vidhansabha Election: डिजिटल जाहिरातींवर १० दिवसांत ६.८० कोटी खर्च, भाजप आघाडीवर; तर काँग्रेस दुसऱ्या क्रमाकांवर

SCROLL FOR NEXT