नाशिक : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत महापालिका क्षेत्रात रविवारी (ता. ३) पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत शहरातील पाच वर्षाच्या आतील दोन लाख १२६ बालकांना पोलिओ डोस पाजले जाणार आहेत. (Nashik Polio Vaccination marathi news)
मोहिमेसाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली सिटी टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीत पोलिओ लसीकरण मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. या मोहिमेकरीता शहरात ८७६ पोलिओ लसीकरण बूथ उभारले जाणार आहेत.
६५ ट्रान्झिट टीम, ४२ मोबाईल टीम राहतील. जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केले. त्यानुसार महाराष्ट्रात १९९५ पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दर वर्षी राबविली जाते. पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी विशेष पल्स पोलिओ मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. (Latest Marathi News)
३ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाच दरम्यान ही मोहीम राबविली जाईल. या मोहिमेत जी बालके पोलिओ डोसपासून वंचित राहतील, त्यांना ४ ते ८ मार्च दरम्यान आयपीपीआयअंतर्गत घरभेटी, मोबाईल टीम, ट्रान्झिट टीम, नाइट टीमद्वारे डोस दिला जाईल.
या बैठकीस वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजिता साळुंखे, प्रशांत शेटे, शिक्षण अधिकारी बी. टी. पाटील, जागतिक आरोग्य संघटनेचे सदस्य डॉ. प्रकाश नांदापूरकर, रोटरी क्लबचे मंगेश अपशंकर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.