नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीला प्रारंभ होण्यापूर्वीच राजकीय पक्षांच्या कुरबुरी सुरू झाल्या असून, त्यावरून गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. पाथर्डी फाटा आणि इंदिरानगर परिसरामध्ये भिंतीवर भाजपने रेखाटलेल्या कमळ या चिन्हाशेजारीच काँग्रेसचा पंजा रेखाटल्यामुळे पक्षाच्या चिन्हाचे विद्रुपीकरणप्रकरणी काँग्रेसच्या सहा पदाधिकाऱ्यांविरोधात ‘महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ डिफेंसमेंट ऑफ ॲक्ट १९९५ चे कलम-३ अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik political Crime against 6 office bearers of Congress for drawing hand next to lotus logo of bjp marathi news)
जिल्हा ग्रामीण युवक काँग्रेसचे सरचिटणीस पंकज सोनवणे, युवक काँग्रेसचे प्रवक्ता महेश देवरे, सोशल मीडियाचे देवेन मारू, त्र्यंबकेश्वर तालुकाध्यक्ष गणेश कोठुळे, देवळाली विधानसभा अध्यक्ष हेमंत पवार, उपाध्यक्ष सागर पिपलंके यांच्याविरोधात ऋषिकेश किशोर शिरसाठ (रा. पाटील गार्डन, चार्वाक चौक, इंदिरानगर) यांच्या फिर्यादीनुसार इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपतर्फे पाथर्डी फाटा येथील आर. के. लॉन्स व केंब्रिज स्कूलजवळ जाहिरात रेखाटली आहे. त्यावर ‘अब की बार फिर से मोदी सरकार’ असा उल्लेख आहे. जाहिरातीजवळील मोकळ्या जागेत ‘कमळ’ चिन्हाशेजारीच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष चिन्ह ‘पंजा’ रेखाटत ‘रोजगार दो, न्याय दो’, असाही उल्लेख केला.
त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावरील इन्स्ट्राग्रामवर अपलोड केले. त्यावरून पक्षचिन्ह व संदेश रेखाटून पक्ष चिन्हासह प्रॉपर्टीचे विद्रूपीकरण केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगरचे पोलिस हवालदार एस. पी. गारले हे पुढील तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.