K C padavi, Nana Patole, & Khoskar esakal
नाशिक

Nashik Political: आदिवासी आमदारांमधील वाद थेट पक्षश्रेष्ठींसमोर! पक्षासमोर आर्थिक वादावरून गटबाजीचे नवीन आव्हान

Political News : लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लागलेली घरघर अद्यापही थांबताना दिसत नाही

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला लागलेली घरघर अद्यापही थांबताना दिसत नाही. पक्षातून वरिष्ठ नेते बाहेर पडत असताना आता आमदारांमधील आर्थिक वाद चव्हाट्यावर येत आहेत. दोन आदिवासी आमदारांमधील वाद थेट पक्षश्रेष्ठींसमोर पोचल्याने पक्षासमोर गटबाजीचे नवीन आव्हान उभे राहिले आहे. (Nashik Political congress party marathi news)

इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी माजी आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांनी आदिवासी भागातील रस्ते कामे मंजूर करण्यासाठी घेतलेले सुमारे एक कोटी ६४ लाख रुपये परत करत नसल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केली आहे.

आमदार खोसकर यांच्या तक्रारीनंतर आदिवासी आमदारांमधील पक्षांतर्गत वाद टोकाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. खोसकर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत, तर के. सी. पाडवी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथील काँग्रेसचे आमदार आहेत.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पाडवी यांनी नाशिक जिल्ह्यात आदिवासी विकास विभागाच्या निधीतून रस्ते विकासाची कामे करण्यासाठी आमदारांकडून सुमारे एक कोटी ६४ लाख रुपये घेतल्याचा आरोप आमदार खोसकर यांनी केला आहे.

विधान परिषदेचे सभापती नरहरी झिरवाळ यांनीही आदिवासी भागातील कामे मंजूर होत नसल्याची तक्रार तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यामुळे पाडवी यांनी मंजूर केलेल्या बिगरआदिवासी भागातील कामांना स्थगिती देण्यात आली होती. याचदरम्यान राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले.

त्यानंतर खोसकर यांनी पाडवी यांना दिलेली एक कोटी ६४ लाख रुपयांची रक्कम मागितली. मात्र पाडवी यांनी ती रक्कम दिली नाही. अधिक तगादा लावल्यानंतर पाडवी यांनी ३० लाख रुपये दिल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले. त्यानंतर नंदुरबार, पवई येथे चकरा मारायला लावल्या. (Latest Marathi News)

मात्र त्यानंतरही पाठपुरावा केल्यानंतर रक्कम दिली नाही. त्यामुळे आपण पक्षाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार केल्याचे आमदार खोसकर यांनी सांगितले. दरम्यान, आदिवासी भागातील दोन्ही काँग्रेसच्या आमदारांमधील आर्थिक वाद चव्हाट्यावर आल्याने ऐन निवडणुकीच्या काळात भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे आता निवडणुकीत हा मुद्दा चर्चेचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

"तत्कालीन आदिवासी विकासमंत्री पाडवी यांच्याकडून दिलेले पैसे मिळत नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे. पैसे न मिळाल्यास दिल्लीत वरिष्ठांकडे तक्रार करणार."- हिरामण खोसकर, आमदार, इगतपुरी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Anil Deshmukh Attack: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला! शरद पवार काय म्हणाले? तर सुप्रिया सुळेंचा थेट इशारा

Railway News: पश्चिम रेल्वेला लागले सुरक्षेचे ‘कवच’, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Updates : राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी जावेद अख्तर यांना दिलासा

Nagpur East Assembly Election : पूर्व नागपूरच्या निवडणुकीत अपक्ष कुणाला देणार धक्का? चौरंगी लढतीने निवडणुकीत चुरस

Trending : 10 वर्ष,47 वेळा केली चोरी; न्यायालयाने दिली अशी शिक्षा की पूर्ण करायला घ्यावे लागतील 4 जन्म

SCROLL FOR NEXT