Nashik MNS News : शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात बढतीसत्र सुरु असताना दुसरीकडे नाशिक शहरात मनसेमध्ये राजीनामा नाट्य रंगले आहे. पक्षाच्या विभाग प्रमुखांसह काही पदाधिकाऱ्यांनी थेट पक्षप्रमुखांकडे राजीनामे पाठविल्यानंतर धावपळ उडाली. मनधरणीनंतर राजीनामे मागे घेण्यात आले. यानिमित्ताने नाशिक ऑप्शनला टाकण्याकडे पक्षाची वाटचाल सुरू झाल्याचे मानले जात आहे. (Nashik political Resignation drama in MNS Persuasion of office bearers by superiors marathi news)
एकेकाळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला राहिला आहे. मनसेला प्रथमच महापालिकेत सत्ता नाशिककरांनी दिली. पाच वर्षांनंतर मात्र मनसेची अवस्था वाईट झाली. पक्षाला नगरसेवकांच्या विजयाचा दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. मात्र दुसरीकडे पक्षांतर्गत गटबाजी वाढत गेली.
पक्षाचे प्रमुख नेते भाजप, शिवसेना व अन्य पक्षात गेले. मात्र तरीही गटबाजी थांबली नाही. शहर व जिल्ह्याच्या नेतृत्वात बदल करण्यात आले. मात्र गटबाजी कमी होण्याऐवजी आणखी वाढली. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेने नाशिकमध्ये वर्धापन दिन साजरा करण्याची तयारी सुरू केली. (Latest Marathi News)
मार्च महिन्यात नऊ तारखेला पक्षाचा भव्य मेळावा दादासाहेब गायकवाड सभागृहात होणार आहे. त्याची तयारी सुरू असताना पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने पक्षांतर्गत खळबळ उडाली. विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना पक्षाच्या प्रमुख बैठकांना न बोलाविणे, लोकसभा मतदारसंघ संघटक किशोर शिंदे यांच्याकडून गटबाजी, पक्षाचे नवनिर्वाचित महानगरप्रमुख सुदाम कोंबडे यांच्याकडून ठोस काम होत नसल्याचा आरोप करत राजीनामास्र काढल्याचे बोलले जात आहे.
"शहरातील काही पदाधिकाऱ्यांनी गैरसमजातून राजीनामे दिले आहेत. मात्र त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी राजीनामे मागे घेत एकदिलाने मनसेचे काम करण्याची ग्वाही दिली."
- पराग परिवर्तित मजकूर: शिंद्रे, प्रदेशाध्यक्ष, मनसे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.