Aditya Thackeray and dignitaries wishing Sunil Bagul while giving bouquets on his Abhishtchintan ceremony. esakal
नाशिक

Thackeray Group News : सुनील बागूल निष्ठावंत शिवसैनिक : आदित्य ठाकरे

Aditya Thackeray News : जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे अहोरात्र असे कार्य केले असल्याचे गौरवोद्गार युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

Thackeray Group News : सुनील बागूल यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. ते अत्यंत निष्ठावंत शिवसैनिक आहेत. जिल्ह्यात पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे अहोरात्र असे कार्य केले असल्याचे गौरवोद्गार युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले. (Nashik political shivsena Thackeray Group News)

शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागूल तसेच युवा सेना सचिव मनीष बागूल यांचा अभीष्टचिंतन सोहळा रामवाडी (पंचवटी) येथे झाला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास शिवसेना युवासेना सचिव वरुण सरदेसाई, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख विजय करंजकर,

महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी महापौर विनायक पांडे, माजी उपमहापौर भिकूबाई बागूल, शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, नितीन आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यंदाही विविध समाजपयोगी उपक्रम घेण्यात आले. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बागूल यांची भेट घेत शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेवक संजय चव्हाण, देवानंद बिरारी, प्रशांत दिवे, महेश बडवे, श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष अजय बागूल, कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक, महानगरप्रमुख मामा राजवाडे, गुलाब भोये,

जगदीश गोडसे, सचिन राणे, गणेश बनकर, बंटी बागूल, राहुल ताजनपुरे, संदीप जाधव, दिनेश जाधव, संतोष पाटील, अमोल पाटील, सागर देशमुख, मनोज जाधव, राजेंद्र बाघले आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच शिवसैनिक आणि चाहते उपस्थित होते.

"शिवसेना हा माझा श्वास असून, पक्षाने मला पदांचे भरभरून दान दिले. अखेरच्या श्वासापर्यंत मी प्रामाणिक राहीन व संघटन अधिक बळकट करणार आहे. माझ्या अभीष्टचिंतन सोहळ्यास युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी लावलेली उपस्थिती हा माझा मी सन्मान समजतो. शिवसैनिकांचे प्रेम हीच माझ्या कार्याची खरी पावती आहे."

- सुनील बागूल, उपनेते, शिवसेना (उबाठा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT