Ramdas Athawale esakal
नाशिक

Nashik : देवळालीसह भुसावळ, श्रीरामपूरवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा दावा! विधानसभेच्या 8 ते 9 जागांची रिपाइंसाठी मागणी

Latest Vidhan Sabha Election 2024 News : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला आठ ते नऊ जागा हव्या आहेत, अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (ता.१२) नाशिक येथे केली.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ताकद देशामध्ये वाढत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएला मिळालेल्या मतांमध्ये आमचीही मते आहेत. मात्र त्या प्रमाणात सत्तेमध्ये आम्हाला वाटा मिळालेला नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला आठ ते नऊ जागा हव्या आहेत, अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी (ता.१२) नाशिक येथे केली. (Ramdas Athawale claim on Devalali and Bhusawal Srirampur)

शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील देवळाली, भुसावळ व श्रीरामपूर या विधानसभेच्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. यामधील देवळाली जागा ही प्रकाश लोंढे यांच्यासाठी हवी आहे. नॉर्थ ईस्टमध्ये आमचे दोन आमदार निवडून आलेले आहेत. तेथे आमच्या पक्षाला चिन्ह ही मिळालेले आहे.

त्याचबरोबर इतर केंद्रशासित प्रदेशांमध्येही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा प्रभाव वाढत आहे. पूर्वी आमच्या पक्षाला मंत्रिपद, विधान परिषद, विविध महामंडळांमध्ये प्रतिनिधित्व मिळाले होते, मात्र अलीकडच्या काळात कार्यकर्त्यांना संधी मिळालेली नाही, म्हणून त्यांना संधी देण्यासाठी विधानसभेत आम्हाला आमच्या हक्काच्या जागा हव्या आहेत, या मागणीवर ठाम असल्याचे सांगितले. (latest marathi news)

महायुतीला निर्विवाद यश

आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक पक्ष कार्यरत आहेत. रिपाइंचे ऐक्य झाले पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. तसे होत असेल तर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षाचे अध्यक्ष व्हावे. मात्र पक्षाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हेच असावे. त्याला दुसरे कोणतेही नाव देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

देशामध्ये अनेक जाती व धर्म आहेत. काही धर्मांमध्ये अपवादात्मक ठिकाणी ताण-तणाव निर्माण होत आहेत. मात्र देश म्हणून आम्ही सर्व एकत्र आहोत. विरोधकांनी संविधान बदल व आरक्षण या मुद्द्यांवर सरकारवर टीका केली. मात्र निकालातून जनता ही एनडीए बरोबर असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा करत त्यांनी महाराष्ट्रात महायुतीला निर्विवाद यश मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT