Former MLA Rajabhau waje while admitting Vishnupant Chandore, a supporter of Datli MLA Kokate, to Shiv Sena. Officers of Neighbor Market Committee. esakal
नाशिक

Nashik Political: सांगळेंचे मनसुबे उधळण्यासाठी वाजे-कोकाटे यांची हातमिळवणी! सिन्नरमध्ये राजकीय चर्चांना उधाण

Nashik News : सिन्नर बाजार समितीत माजी आमदार वाजे व उदय सांगळे गट सत्तेत असला, तरी मागील काही महिन्यांपासून श्री. वाजे व सांगळे यांच्यात दरी निर्माण झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वावी : सिन्नर बाजार समितीत माजी आमदार वाजे व उदय सांगळे गट सत्तेत असला, तरी मागील काही महिन्यांपासून श्री. वाजे व सांगळे यांच्यात दरी निर्माण झाली आहे. सिन्नर तालुक्यात वर्चस्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असलेल्या श्री. सांगळे यांना रोखण्यासाठी श्री. वाजे व आमदार कोकाटे यांनी बाजार समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत हातमिळवणी केली नसेल ना, असा संशय आहे. (Nashik Political Vaje Kokate join hands Inciting political discussions in Sinnar marathi news)

श्री. वाजे सध्या उद्धव ठाकरे शिवसेना गटात, तर श्री. सांगळे एकनाथ शिंदे गटात आहेत. आठवडाभरापूर्वी बाजार समितीच्या सत्ताधारी संचालकांना घेऊन सांगळे यांनी सह्याद्री गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, संचालकांमध्ये दोन गट पडल्याने पालकमंत्री दादा भुसे यांच्या भेटीपर्यंत प्रकरण संपले.

उपसभापती सौ. कोकाटे यांनी श्री. भुसे यांच्या हस्ते भगवा खांद्यावर घेतला. उर्वरित सदस्य पक्षप्रवेश न करता माघारी परतले. नंतर तालुक्यात वाजे व सांगळे स्वतंत्रपणे फिरताना दिसून आले. मात्र, बाजार समिती सभापती निवडीत दोघे नेते एकत्र आल्याचे बघायला मिळाले. (Latest Marathi News)

मात्र, सांगळे यांना शह देण्यासाठी वाजे गटाकडून शशिकांत गाडे यांच्या पक्षप्रवेशाची खेळी खेळण्यात आल्याची चर्चा आहे. बाजार समितीत वाजे व सांगळे यांचे समान संचालक आहेत. आमदार ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडून आलेले दोघी संचालक राजाभाऊंच्या गटात सहभागी झाल्याने साहजिकच वाजे गटाचे बळ वाढले.

सांगळे यांना रोखण्यासाठी आमदार कोकाटे यांच्याकडूनच बाजार समिती सभापतिच्या निवडीत वाजे यांच्या साथीने नवीन डाव टाकला असावा, अशी चर्चा आहे. राजकारणात वजाबाकीपेक्षा बेरजेला स्थान असल्यामुळे कदाचित आमदार कोकाटे यांनी एक पाऊल मागे घेत आपले मोहरे सांगून व शिकवून वाजे गटात पाठवले असतील, तर ते निश्चितच लपून राहणार नाही.

"श्री. गाडे व नेहे यांनी आपल्याला सभापतिपदाची ऑफर असल्याचे सांगितले. सभापतिपदाला दुसरे नाव पुढे आले, तर आपल्या गटाकडून अर्ज दाखल केला जाईल व त्यावेळी सिंधूबाई कोकाटे, गाडे व नेहे यांनी आपल्या उमेदवाराला मतदान करायचे, असे ठरले होते. विरोधकांकडे नऊ संचालक असताना, त्यांच्यापैकी कोणालाही ते या पदांवर बसू शकले नाही, हे दुर्दैव आहे. माजी आमदार वाजे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. विरोधक गटातटाच्या राजकारणाचा विचार करू लागले व त्यात त्यांचीच फसगत झाली."

-ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT