Contaminated green water at Boating Club in Gangapur Dam. esakal
नाशिक

Nashik News : गंगापूर धरणात दूषित पाण्यामुळे प्रदूषण! नाशिककरांच्या आरोग्यास धोका; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

Nashik News : गंगापूर धरणामध्ये अलीकडच्या काळात पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर धरणामध्ये अलीकडच्या काळात पर्यटकांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाले आहे. पर्यटनाला चालना मिळावी म्हणून मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या बोट क्लब परिसरातही काही भागांमध्ये दूषित पाणी साचलेले आहे. हे पाणी ड्रेनेजमुळे दूषित झाले की दुसरे काही कारण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. थेट गंगापूर धरणातच दूषित पाणी जात असल्याने नाशिककरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला असून प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. (Nashik contaminated water in Gangapur Dam)

गंगापूर धरण हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा पाण्याचा विसर्ग दुसऱ्या जिल्ह्यांमध्येही जातो. गेल्या काही वर्षांपासून गंगापूर धरणामध्ये पर्यटनाचा नावाखाली अनेक गैरप्रकार झाल्याचे सांगितले जात आहे. अतिउत्साही पर्यटकांमुळे संपूर्ण गंगापूर धरणाच्या किनाऱ्यावर जवळपास सर्वच बाजूने दारूच्या बाटल्या, प्लास्टिक, बियरचे टीन मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतात.

सध्या धरण परिसरात पाणी कमी आहे, त्यामुळे येथे दूषित पाणी साचल्याचे लगेच लक्षात येते. धरण पूर्णपणे भरलेले असते तेव्हा त्याच्या खालून किती दूषित पाणी धरणाच्या पाण्यामध्ये जात असेल याचा अंदाजही येऊ शकत नाही. गंगापूर धरण परिसरात दूषित झालेलं हिरव्या रंगाचे पाणी व तेलाचा तवंग अगोदरही दिसला होता. तरी जलसंपदा विभागाने तातडीने धरणामध्ये येणाऱ्या दूषित पाण्याचा स्त्रोत शोधून तो तातडीने बंद करून दोषींवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. (Latest Marathi News)

शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. गंगापूर धरणातून जवळपास ६० टक्क्यांहून अधिक टक्के शहराला पाणीपुरवठा होतो. एकलहरे थर्मल पॉवर स्टेशन, एमआयडीसी तसेच गंगापूर कालव्यातून तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा होतो.

अशाप्रकारचे दूषित पाणी नदी-नाल्यांमध्ये मिसळले तर अनेक नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासन दरबारी एकीकडे स्वच्छतेसाठी मोहीम आखली जात असताना, गंगापूर धरणाच्या पाण्यात मात्र वारंवार होणाऱ्या प्रदूषणामुळे संशय व्यक्त होत आहे.

"धरण परिसरात अनेक ठिकाणी पाणी कमी झाले आहे. त्यामुळे खोलगट भागामध्ये पाणी राहते. एकाच ठिकाणी पाणी साचून राहिल्यामुळे तेथे शेवाळ व दूषित स्वरूपाचे पाणी तयार होते. मात्र त्यापासून धरणातील पाणी खूप लांब आहे. ते पाणी ड्रेनेजमधील नाही, तरी त्याबाबत खबरदारी घेतली जाईल." - मनोज काळे, कनिष्ठ अभियंता, गंगापूर धरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT