Sagar Bhamare & Dipali Bhamare esakal
नाशिक

Farmer Youtube Channel: डाळींब उत्पादक शेतकर्‍यांना 'शेतीमळा'चा लळा! कजवाडेच्या दाम्पत्याच्या युट्युब चॅनलला मिळालं सिल्वर बटन

Nashik News : कजवाडे (ता.मालेगाव) येथील युवा शेतकरी दाम्पत्याने स्वतःचे युट्युब चॅनल सुरू करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे.

- दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : डाळींब उत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला नाशिक जिल्ह्यातील डाळींब उत्पादक शेतकरी गेल्या काही वर्षांपासून डाळींबावरील तेल्या, मर रोगामुळे अडचणीत सापडले आहेत. या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन दीपस्तंभ म्हणून काम करण्याची जिद्द मनात बाळगून कजवाडे (ता. मालेगाव) येथील युवा शेतकरी दाम्पत्याने स्वतःचे युट्युब चॅनल सुरू करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुरू केले आहे.

हे 'शेती मळा' चॅनल डाळींब उत्पादकाना दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत आहे. याच यशाची दखल घेत अमेरिका येथून युट्युब कंपनीच्या कार्यालयाकडून या दाम्पत्याचा 'सिल्वर बटन' पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. (nashik Sheti mala Kajwade couple YouTube channel marathi news)

कजवाडे येथील युवा शेतकरी दीपाली आणि सागर भामरे या दाम्पत्याने गेल्या दोन वर्षांपूर्वी डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 'शेतीमळा' हे युट्युब चॅनल सुरू केले. या चॅनलच्या माध्यमातून डाळिंब उत्पादनात वाढ व त्यावर येणाऱ्या तेल्यासारख्या अन्य रोगांपासून बचावासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले.

प्रत्यक्ष शेतीच्या बांधावरूनच या दांपत्याने आपले व्हिडिओ करून शेअर केले. अगदी सरळ सोपी राहणीमान आणि शेतकऱ्यांना अवगत होईल अशा सोप्या भाषेत केलेले मार्गदर्शन डाळींब उत्पादकांना फायदेशीर ठरवू लागले. बघता 'शेती मळा' या यूट्यूब चॅनलने लाखाहून अधिक सबस्क्राईबर मिळवले.

चॅनलची वाढती लोकप्रियता आणि वाढती महती यामुळे डाळींब उत्पादकांसाठी 'शेतीमळा' जणू दीपस्तंभाची भूमिका बजावत आहे. एका शेतकरी दांपत्याने सुरू केलेल्या या शेती मळा यूट्यूब चॅनलमुळे अनेकांचे उत्पादन वाढले आहे. याचीच दखल घेऊन नुकतेच त्यांना अमेरिका येथून युट्युब कंपनीकडून 'सिल्वर बटन' हा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. (Latest Marathi News)

त्यांनी सुरू केलेल्या या आधुनिक युगातल्या शेतीमध्ये शिक्षणाचा योग्य फायदा घेत त्यांनी शेतीमधून जास्तीत जास्त उत्पन्न कसे काढता येईल, तसेच शेतमालाला भाव कोणत्या ऋतूमध्ये राहील याची जाणीव त्यांनी शेतकरी बांधवांना यूट्यूब चैनल च्या माध्यमातून करून दिली आहे. या भामरे दाम्पत्याचे तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात चर्चा होत आहे.

"आम्ही माळमाथा परिसरात राहतो तिथं पाण्याची टंचाई पाचवीलाच पुजलेली यामुळेच कमी पाण्यात शेती कशी करावी याचे नियोजन आम्ही आमचे 'शेतीमळा' यूट्यूब चॅनलवर नेहमीच टाकत असतो. या युट्युब चॅनलची दखल घेऊन सिल्वर बटन मिळाले यामुळे पुन्हा उर्जा निर्माण झाली आहे."- सागर भामरे, डाळींब उत्पादक कजवाडे.

"नवनवीन प्रयोग आमच्या शेतात करतो ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी युट्युबच्या माध्यमातून 'शेतीमळा' चॅनलवर अपलोड करतो. व्हिडिओला शेतकऱ्यांनी उदंड प्रतिसाद दिला त्यामुळे आज आम्हाला थेट अमेरिकेतून सिल्वर प्ले बटन प्राप्त झाले. त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे आभार."

- दिपाली भामरे, डाळींब उत्पादक कजवाडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT