The plight of the road under the Central Railway underpass at Kasbe Sukene. In the second photo, the yards come out in the middle of the road. esakal
नाशिक

Nashik Road Damage : अंडरपासवर खड्डेच खड्डे, कॉंक्रिटचे गजही बाहेर! कसबेसुकेणे येथील रस्त्याची दुरवस्था

Latest Nashik News : सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे लोखंडी गज बाहेर आल्याने या अंडरपास खालून जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण अशी प्रतिक्रिया वाहनचालक जितेंद्र मोगल, दीपक मोगल, शरद बोंबले, सचिन मोगल आदींनी व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

कसबे सुकेणे : कसबे- सुकेणे (ता. निफाड) येथील मध्य रेल्वेने तयार केलेल्या अंडर बायपासवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी काही प्रमाणात केलेल्या काँक्रिटीकरणातून लोखंडी गज बाहेर आल्याने हे गज व खड्डे अपघाताला निमंत्रण ठरत आहेत. दुचाकीने प्रवास करणाऱ्यांची दररोज घसरगुंडी उडत असून वाहने घसरत आहेत.

सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे लोखंडी गज बाहेर आल्याने या अंडरपास खालून जाणे म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण अशी प्रतिक्रिया वाहनचालक जितेंद्र मोगल, दीपक मोगल, शरद बोंबले, सचिन मोगल आदींनी व्यक्त केली आहे. (Potholes on underpass in Kasbesukene)

आठवडाभरातील पावसाने याठिकाणी १० ते १२ दुचाकी घसरून अपघात झाले आहेत, त्यामुळे सुकेणे परिसरात रेल्वेच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे. कसबे सुकेणे रेल्वेस्थानकाजवळ रेल्वे फाटक होते, ते बंद करून रेल्वेने बाणगंगा नदीच्या पात्राजवळून पूररेषेतून निफड - सुकेणे- ओझर वाहतुकीसाठी अंडरपास तयार केला आहे.

हा अंडरपास तयार करत असताना रस्त्याचे केवळ खडीकरण व साधे कॉंक्रिटीकरण रेल्वेने केले. मात्र मजबुतीकरण करून रस्ता न बनविल्याने सध्या या अंडरपासची पुरती वाट लागली आहे. नदीच्या बाजूचा पूर्वीच्या टेकड्यांचा चिकट मातीचा राडारोडा रस्त्यावर आला आहे.

सुमारे पाच ते दहा फूट गोलाई, लांबी आणि दीड ते दोन फूट खोलीचे खड्डे याठिकाणी तयार झाले आहेत. गेल्या वर्षी रस्ता घाईघाईने सिमेंटचा बनविण्यात आला, मात्र हे सिमेंट आता हळूहळू निघत असून मातीसोबत एकरूप झाले आहे. (latest marathi news)

त्यातून लोखंडी गज बाहेर आले आहेत. परिणामी येथे दररोज अपघात होत आहेत. दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहेत. मध्य रेल्वेच्या नाशिकरोड, भुसावळ, मनमाड येथील रेल्वेच्या बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, पिंपळस रामाचे आदी परिसरातील नागरिकांनी केला आहे.

"कसबे सुकेणे अंडरपास म्हणजे साक्षात मृत्यूला निमंत्रण आहे, दररोज अपघात होत आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तातडीने दुरुस्ती करावी."

- राजाराम मोगल ग्रामस्थ मौजे सुकेणे.

"अंडरपास रस्त्याबाबत वारंवार मागणी करूनही त्याची दुर्दशा थांबत नाही. मध्य रेल्वेने दखल घ्यावी. खासदार आणि लोकप्रतिनिधीही लक्ष द्यावे."- सचिन मोगल, उपसरपंच, मौजे सुकेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

Sakal Podcast: महायुतीचा महाविजय, मविआचा धुव्वा ते शिंदेंची शिवसेना हीच खरी शिवसेना!

Panchang 24 November: आजच्या दिवशी श्री सूर्यांय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

आजचे राशिभविष्य - 24 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT