देवळा : शेतकऱ्यांचा प्रमुख जोडधंदा असलेला कुक्कुटपालन व्यवसाय तीव्र उन्हामुळे व पाण्याच्या दुर्भिक्ष्यतेमुळे संकटात सापडला आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे तापमानाची तीव्रता खूप आहे. बॉयलर पक्ष्यांना उष्णतेचा त्रास मोठ्या प्रमाणात होतो.
रात्री थंडी आणि दिवसा कडक ऊन अशा विषम हवामानामुळे पक्षी मरण्याचे प्रमाण वाढून नुकसान होत आहे. या परिस्थितीमुळे कसमादे भागातील बहुतेक शेड आता रिकामे राहणार आहेत. (nashik Poultry Business Crisis suffering from drought Feed prices increased with chicks marathi news)
कसमादे पट्ट्यात कुक्कुटपालन व्यवसाय हा बहुतांश शेतकऱ्यांचा प्रमुख पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायातून शेतकऱ्यांनी मोठी प्रगती साधली आहे. परंतु, सध्या उष्णतेचा दाह खूप असल्याने या कोंबड्यांना हे प्रतिकूल वातावरण मानवत नाही. त्यातच तीव्र पाणीटंचाई भासत असल्याने उन्हाळ्यात कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. कोंबड्यांना पाणी बदल करावे लागत नाही. तसे केले तर सर्दीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शुद्ध व स्वच्छ पाणी एकाच जागेवरचे लागते.
खर्चात ५ ते ७ रुपयांनी वाढ
मक्याचे भाव वाढल्याने कोंबडीखाद्यही महागले आहे. यामुळे खर्चात प्रतिकिलो ५ ते ७ रुपयांनी वाढ झाली आहे. मक्याचे दर यंदा २२०० ते २४०० रुपयांवर गेले आहेत. यामुळे कोंबडीचा प्रतिकिलो खर्च ७० ते ८० रुपयांपर्यंत गेला आहे. आणि सध्या बॉयलर कोंबडी सरासरी १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे.
कोंबड्या जगविण्याची कसरत
चिकन गरम व प्रोटीनयुक्त असल्याने हिवाळ्यात हा व्यवसाय तेजीत असतो. परंतु, उन्हाळ्यात मागणी कमी असते. बोकडाच्या मटणाचे भाव वाढलेले असल्याने अनेकजण बॉयलर कोंबडीवर समाधान मानत असतात. त्यामुळे नाही म्हटले तरी सध्या कोंबडीला मागणी आहे. पण, अशा वातावरणात कोंबड्या जगवणे तारेवरची कसरत झाली आहे.
काय आहेत कारणे?
पक्ष्यांचे वाढते भाव, तीव्र उष्णता यामुळे पक्ष्यांचे वजन न वाढणे, पाण्याचे दुर्भिक्ष्य, मजुरांची टंचाई, गव्हाच्या भुशाची अनुपल्बधता यामुळे हा व्यवसाय संकटात सापडला आहे. बऱ्याच व्यावसायिकांचे शेड आता रिकामे पडू लागले आहेत.
असा येतो खर्च
पक्षी (लहान पिलू ) : ४० ते ४२ रुपये
खाद्य : ३५ ते ४५ रुपये किलो
तांदूळ तूस : ८-९ रुपये किलो
औषधे : ५ ते ८ रुपये प्रतिपक्षी
मजुरी : ४०० रुपये रोज
पाण्याचा टँकर : ८०० रु.
दुष्काळाचा फटका या व्यवसायालाही बसला आहे. उष्णता व पाणीटंचाईमुळे कोंबड्यांचे संगोपन करणे अवघड झाले आहे. गव्हाचा भुसा मिळत नसल्याने महाग मिळणारे तांदळाचे तूस वापरावे लागते. उष्णतेमुळे पक्षांचे वजन वाढत नाही. तसेच सर्दी, फ्ल्यू यासारखे संसर्गजन्य आजार होतात. त्यामुळे उन्हाळ्यात व्यावसायिक पिले टाकण्यास धजावत नाहीत.
- दिनेश सोनजे, व्यावसायिक, पिंपळगाव (ता.देवळा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.