नाशिक : सिडको परिसरातील दाटीवाटीच्या लोकवस्तीमध्ये अनेक ठिकाणी वीजखांब रस्त्यालगत असल्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. अंबड लिंक रोडवरील रुंगठा शॉपिंग सेंटरजवळ रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या या लोखंडी विजेच्या खांबामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सिडकोतील अंबड लिंक रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. येथील रस्त्याच्या बाजूला असलेले विजेचे लोखंडी खांब धोकादायक ठरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Power poles is on middle of road in cidco area )
अशा खांबामुळे वाहनांचा अपघात होऊन एखाद्या नागरिक गंभीर जखमी होऊ शकतो. या खांबांवर कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर लावलेले नाहीत. हे खांब रात्री दिसून येत नाहीत. तसेच खांबांवर अनेक प्रकारच्या खासगी जाहिरातीचे बोर्ड लावलेले आहेत आणि अशा बोर्डामुळे खांबाच्या पुढील भागाकडे बघण्यास वाहन चालकांना अडथळा निर्माण होतो. अनेक वेळा या एकेरी मार्गावर ओव्हरटेक करत असताना खांबांचा अंदाज न आल्यामुळे अनेक नागरिकांनी खांबांना धडक दिल्याचे समजते.
रस्त्यातील खांबामुळे वाहनांना रस्ता अपुरा पडतो. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. परिसरातील बरेच विजेचे खांब भूमिगत करण्याची गरज आहे. अंबड लिंक रोडवरील शुभम पार्क ते उपेंद्रनगर परिसरातील रस्त्यात अडथळा ठरणारे जीवघेणे विजेचे खांब आणि त्यावरील तारा भूमिगत करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. (latest marathi news)
''रात्री नागरिकांना हे खांब स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे अनेक वेळा दुचाकीस्वार येऊन धडकतात. त्यामुळे वाहनांचे नुकसान होते. एखादा मोठा अपघात होऊ शकतो.''- चेतन अत्तरदे, नागरिक
''विजेच्या तारालगत मोठे झाड आहे. अनेक वेळा या झाडाच्या फांद्या या विजेच्या प्रवाहामुळे धक्का लागून तुटून पडत असतात. त्यामुळे असे खांब भूमिगत करण्याची गरज आहे.''- देवा सूर्यवंशी, स्थानिक नागरिक
''महावितरण कंपनी तसेच कर्मचाऱ्यांनी या ठिकाणची परिस्थिती माहिती असून ते बराच वेळा या प्रकरणाकडे काणाडोळा करण्याचा प्रयत्न करतात एखादा मोठा अपघात घडल्यानंतर कंपनीला जाग येईल, असे वाटते.''- शरद पाटील, व्यावसायिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.