Dabhadi shade blown from Jyoti Nikam house due to stormy rains, Manmad Rains here on Wednesday  esakal
नाशिक

Nashik Pre-Monsoon Rain : मृगाआधी पावसाची वादळी सलामी! चांदवड, दाभाडी, मनमाडसह ठिकठिकाणी घरांचे नुकसान

Nashik News : दाभाडी, ब्राम्हणगाव, चांदवड परिसर, मनमाडसह जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी (ता.४) तसेच बुधवारी (ता.५) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : दाभाडी, ब्राम्हणगाव, चांदवड परिसर, मनमाडसह जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी (ता.४) तसेच बुधवारी (ता.५) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. काही भागात अर्धा तास मुसळधार पाऊस झाल्याने कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यातून सुटका झाली. या पावसामुळे शेतीच्या कामांना वेग येणार आहे. दुसरीकडे पावसाबरोबरच आलेल्या वादळामुळे पत्रे उडाल्याने घरांचे नुकसान झाले असून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.

चांदवडला दुपारनंतर मुसळधार

गणूर : चांदवड तालुक्यात बुधवारी (ता.५) सायंकाळी पावसाने मुसळधार हजेरी लावली. पावसा सोबत वाऱ्याचा वेग देखील जास्त असल्याने शहर तालुक्यात विविध ठिकाणी मोठे नुकसान झाले. चांदवड- गणूर रोडवरील मनोज कोतवाल यांच्या गाईंच्या गोठ्याचे अन् मजुरांच्या घराचे पन्नास पत्रे उडाले. घरात असलेल्या मजुरांना व जनावरांना मनोज कोतवाल यांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी हलविल्याने मोठी दुर्घटना टळली मात्र संपूर्ण घराचे पत्रे उडाले.

भिंती खचल्याने घरातील साहित्याचे देखील नुकसान झाले. घरातील धान्य, कपडे इतर घरगुती उपयोगाच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी साडेचारनंतर मुसळधार स्वरूपात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी पाणी तुंबले असून कोतवाल यांच्या घराकडे जाणाऱ्या ओहळाला देखील मोठे पाणी सुरू असल्याने उशिरापर्यंत पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठींना तिथे पोचता आले नाही.

मुंबई आग्रा महामार्गावर कॉलेज रोडवर असलेल्या पुलाखाली हॉटेल भैरवनाथ मागील परिसरातून मोठे पाणी आल्याने पूल अर्धा पाण्याखाली बुडाला. यामुळे शाळा, कॉलेजातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे व परिसरातील नागरिकांचे काही काळ हाल झाले. (latest marathi news)

दाभाडी येथे घरांचे नुकसान

दाभाडी : येथे मंगळवारी (ता.४) पावसाने संध्याकाळी हजेरी लावली. इंदिरानगर येथील ज्योती निकम यांच्या घराचे पत्रे उडाल्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. जळगाव शिवारात वृक्ष व अनेक विजेचे पोल वाकले असून शेतकऱ्यांना अंधारात रात्र काढावी लागली आहे. निकम यांच्या राहत्या घरातील २२ पत्रांचा साठा उडून गेला.

त्यातच पावसामुळे संसारोपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तलाठींनी घराचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी निकम यांनी केली आहे. वादळामुळे ग्रामीण रुग्णालयाजवळ तीन, जुने जळगाव शिवारातील सुरेश निकम यांच्या शेतालगत वीज वितरण कंपनीचे तीन ते चार पोल वाकले आहेत.

त्यामुळे या भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. जवाहरनगर येथे निंबाच्या झाडाखाली उभ्या असलेल्या ओम्नीवर झाड उन्मळून पडल्याने नुकसान झाले. दाभाडी शिवारात विजय त्र्यंबक देवरे यांचे शेड नेट ही जमीनदोस्त होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चांदवड तालुक्यात समाधान

चांदवड ः चांदवड शहरासह तालुक्यातील अनेक गावांत बुधवारी (ता.५) वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. जूनच्या पहिल्याच समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली. शहरातील फुलेनगर परिसरात स्कूल बसवर झाड पडून बसचे नुकसान झाले.

पहिल्याच पावसात शहरातील बाजारातळ व इतर भागात पाणी तुंबल्याने व्यापारी व नागरिकांचे हाल झाले. दुसरीकडे दरसवाडी, शिंगवे, मेसनखेडे, डोणगाव, तळवाडे, गणूरसह अनेक गावांत चांगला पाऊस होऊन शेतात पाणी साचले होते. नदी नाल्यांमध्ये पाणी वाहिल्याने शेतीच्या कामांना आता वेग येणार आहे.

विजेच खांब मोडून पडले

ब्राह्मणगाव (ता. बागलाण) ः येथे वादळी वाऱ्यासह पावसाने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. अर्धा तास पाऊस सुरू असल्याने शेतशिवारात पाणी साचले होते. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब मोडून पडले तर विजेच्या तारा तुटून पडल्याने गावातील व शेतशिवारातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गाव व शेतशिवारात अनेक मोठमोठ्या झाडांच्या फांद्या मोडून रस्त्यावर पडल्या होत्या. महावितरणचे जनमित्र वरिष्ठ तंत्रज्ञ गोरख निकम, विकी ठाकरे यांनी शेतशिवारातील वीजपुरवठा सुरळीत सुरू केला.

मनमाडला ४० मिनिटे पाऊस

मनमाड : शहर परिसरातील तापमानात बुधवारी काहीशी घट दिसून आली. पारा ३४ अंशावर राहिला. बुधवारी दुपारनंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली. वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पावसाळी मोसम सुरू होण्यास आता केवळ काही दिवस शिल्लक राहिले असून आज विविध भागात चांगला पाऊस पडला.

हवामान खात्याने आज,उद्या देखील अनेक भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.त्यासाठी काही ठिकाणी यलो अलर्टही जारी केला आहे. यंदा पावसाळ्याला लवकर सुरवात होईल, असा अंदाज यापूर्वीच हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. बुधवारी दुपारनंतर सर्वत्र सुमारे चाळीस मिनिटे पडलेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

SCROLL FOR NEXT