Health inspector Yashwant Tathe and cleaning staff while cleaning the drains in the face of Igatpuri monsoon. esakal
नाशिक

Drain Cleaning : इगतपुरीत पूर्वपावसाळी काम अंतिम टप्प्यात; शहरात नगर परिषदेकडून नाले-गटारी सफाई सुरु

Nashik News : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी शहरातील लहान मोठे नाले, गटारी स्वच्छता मोहीम राबवून नगरपरिषदेने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पावसाचे माहेरघर असलेल्या इगतपुरी शहरातील लहान मोठे नाले, गटारी स्वच्छता मोहीम राबवून नगरपरिषदेने शहर स्वच्छता मोहीम हाती घेतल्याने नागरीकांना दिलासा मिळाला आहे. पावसाच्या आधीच शहरातील मोठे नाले रस्त्यालगतच्या नाले गटारीतील घन कचरा काढून नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पंकज गोसावी यांनी नागरिकांच्या तक्रारी येण्यापूर्वीच स्वच्छता मोहीम हाती घेतली. (Pre-monsoon work in final stage in Igatpuri)

पावसाळ्यात गल्ली वस्तीमध्ये व घरात पाणी घुसणार नाही याची काळजी घेताना आरोग्य निरिक्षक यशवंत ताठे यांनी सफाई कर्मचाऱ्यांकडून डासांचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामाला गती दिली आहे. शहरात पावसाळ्यात गल्ली व मुख्य रस्त्यावर घन कचरा वाहून येतो. अनेकांच्या घरात पाणी घुसून जनजीवन विस्कळित होते. वाहतुकीला आणि नागरी मार्गक्रमाला मोठे अडथळे निर्माण होण्याची शक्यता असल्याने ही बाब लक्षात घेत पाऊस सुरू होण्यापूर्वीच नाले सफाई सुरु आहे.

कामांना वेग

शहरातील लोया रोड, बजरंग वाडा, मासळी बाजार, भाजी बाजार, शिवाजी चौक, गुप्ता व्यायाम शाळा, खालची पेठ,तीन लकडी आदी भागातील तसेच शहरातील सर्वच प्रभागातील नाले, गटारी आदी घनकचरा स्वच्छ करण्याचे काम मोठया प्रमाणात सुरु केले. (latest marathi news)

शहरातील सर्व प्रभागात किटक नाशके फवारणी करणार असून यावेळी शहरात पावसाळ्यात विविध किटकांचा प्रादुर्भाव रोखण्याचे काम करणार असल्याचे मुख्याधिकारी पंकज गोसावी, आरोग्य निरिक्षक यशवंत ताठे व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

"शहरात दरवर्षी पावसाळ्यात स्वच्छता मोहीम राबविताना अडथळे येतात. घरांत घुसलेले पाणी काढताना नागरिकांचा वेळ जात असल्याने यंदा पावसाळ्यापूर्वीच नाले व गटारी साचलेली घाण उचलली गेली तर पावसाळी आजारांचे प्रमाण कमी होईल. कीटकनाशक फवारणीचा चांगला उपयोग होवुन पर्यावरण स्वच्छ राहण्यास मदत होते." - पंकज गोसावी, मुख्याधिकारी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT