पिंपळगाव बसवंत : थ्री इंडियट्स चित्रपटातील मोनाच्या प्रसुतीचा अंगावर शहारे आणणारा प्रसंग सर्वांनी बघितला असेल. असाच गरोदर मातेच्या प्रसुतीचा थरार पिंपळगाव बसवत शहरात भर रस्त्यावरच घडला. प्रसुतीदरम्यान मातेने जुळ्या मुलांना जन्म दिला. पिंपळगावच्या प्रसुतीतज्ज्ञ डॉ. गौरी विधाते यांच्या समयसुचकतेमुळे गुंतागुंतीच्या प्रसुतीत बाळ अन् माता सुखरूप आहेत. (pregnant woman gave birth on street gave birth to twins)
नवरा-बायकोच्या आयुष्यातील दुसरा टप्पा म्हणजे आई-वडील होणे. जालीम सैय्यद (रा. उंबरखेड रोड, पिंपळगाव बसवंत) हे पत्नी नगीना सैय्यदसह मोलमजुरी करून कुटुंबासह राहतात. नगीना सैय्यद गरोदर होत्या. नऊ महिन्यांचा कालावधी उलटल्याने प्रसुतीचा कालावधी जवळ आला. अपेक्षित प्रसुतीच्या काही दिवस अगोदर त्यांना गेल्या आठवड्यात पोटात कळा सुरू झाल्या.
असह्य वेदना नगीना यांना सुरु होत्या. जालीम सैय्यद यांनी रिक्षाने तत्काळ दवाखान्यात घेऊन जात असतानाच गुरूकृपा संकुलजवळ बाळाचे डोके बाहेर व शरीर मातेच्या पोटात अशी गुंतागुंतीची स्थिती उदभवली. आई व बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे सर्वांना कळून चुकले होते. या प्रसंगाने जालीम सैय्यद व कुटुंबिय प्रचंड घाबरलेले होते. आणीबाणीचा हा प्रसंग ओळखून रिदम हॉस्पिटलच्या डॉ. गौरी विधाते यांनी घटनास्थळी धाव घेतली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता डॉ. गौरी विधाते यांनी रस्त्यावर नगीनाची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. चारही दिशांनी उपस्थित महिलांनी वस्त्र पकडून आडोसा तयार केला. डॉ. विधाते यांनी अमेरिकेत घेतलेल्या परदेशी शिक्षणाचा कौशल्याने वापर करून प्रसुतीला सुरवात केली. मातेला जोर लावण्यास सांगितले. प्रसुती वेदनामुळे नगीना किंचाळत होती. (latest marathi news)
बाळाच्या नाळेने संकटात अधिकच भर टाकली होती. अखेर डॉ. विधाते यांनी सुखरूप प्रसुती केली. प्रसुतीत आश्चर्य म्हणजे नगीनाने दोन गोंडस जुळ्या बाळांना जन्म दिला. योग्य उपचारानंतर दोन्ही बाळ व माता सुखरूप आहेत. बाळांना स्वच्छ करून नगीनाच्या कुशीत देण्यात आले. त्यावेळी सैय्यद दाम्पत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.
"नगीना सैय्यद यांची प्रसुती अत्यंत गुंतागुतीची होती. त्यात माता किंवा बाळाच्या जीवाला धोकाही होता. कठीण परिस्थितीत आई व बाळांचे प्राण वाचवून सुखरूप प्रसुती करता आली, याचे आत्मीक समाधान आहे. गरोदरपणात योग्य काळजी घेण्याची आवश्यकता असते. अन्यथा, असे प्रसंग उद्भवतात." - डॉ. गौरी विधाते, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.