नाशिक रोड : नाशिक रोडच्या भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयासह देशातील नऊ प्रेसचे महामंडळ झाले असतानाही प्रेस कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील १८ महिन्यांचा ओव्हर टाइम अॅरिअर्स (अतिरिक्त वेळेत थांबून केलेल्या कामाचा भत्ता) मिळणार आहे. १ जानेवारी २०१६ ते ३० जून २०१७ या काळातील माजी तसेच विद्यमान मुद्रणालयातील कामगारांना ही एकूण पाच ते सहा कोटीची थकबाकी मिळणार असल्याची माहिती इंडिया सिक्युरीटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. (Nashik Press workers overtime arrears marathi news)
नाशिक रोडच्या मुद्रणालयासह देशातील नऊ सरकारी प्रेसचे महामंडळात रूपांतर झाले असूनही प्रेस मजदूर संघाने सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे मुद्रणालयातील कामगारांना सातवा वेतन आयोग मिळवून दिला आहे. त्याप्रमाणे सर्वांना पगारवाढही मिळाली. सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सरकारने जुलै २०१७ मध्ये केली.
२ जानेवारी १६ पासून वेतन आयोग लागू केला. त्यामुळे १८ महिन्यांची विविध प्रकारची थकबाकी निर्माण झाली होती. या थकबाकीचे पैसे मजदूर संघाने कामगारांना मिळवून दिले. तथापि, थकबाकीतील १८ महिन्यांचा अतिरिक्त कामाचा भत्ता मिळाला नव्हता.
तो मिळावा यासाठी मजदूर संघाने महामंडळाकडे सातत्याने प्रयत्न केले. पत्रव्यवहार करून, मुख्य समितीकडे विषय मांडून, स्वतंत्र बैठका घेऊन थकबाकीचा मुद्दा पटवून दिला. मात्र, व्यवस्थापनाने निर्णय घेता येणार नसल्याचे सांगून केंद्राकडे हे प्रकरण पाठवले. (latest marathi news)
मजदूर संघाने औद्योगिक कामगार, कर्मचारी यांचे काम व मुद्रणालयाचे काम यांमधील फरक, ओव्हर टाइमबाबतचे सरकारी आदेश, कायदे, ते कोणाला लागू होतात याबाबत तपशिलात माहिती घेऊन ती मंत्रालयांना दिली. मजदूर संघाने ओव्हर टाइमच्या १८ महिन्यांच्या थकबाकीसाठी पाठपुरावा सुरु केला.
जगदीश गोडसे यांनी अर्थ मंत्रालय, कामगार मंत्रालय व अन्य मंत्रालयाकडे विषय मांडला. हिंद मजदूर सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस हरभजनसिंग सिद्ध यांची मदत घेतली. कायदेशीर आधार दाखवून औद्योगिक कामगारांना ओव्हर टाइम का दिला जातो, मुद्रणालयातील कर्मचारीही कसा पात्र आहे हे समजावून सांगितले.
संबंधित मंत्रालयांचे शेरे फाइलवर घेतले. या प्रचंड प्रयत्नांनंतर प्रेस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक रंजन सिंह यांनी ओव्हर टाइमच्या थकबाकीला मंजुरी दिली. त्यांच्यासह प्रेस महामंडळाचे संचालक एस. के. सिन्हा, अजय अग्रवाल, मुख्य महाव्यवस्थापक बी. जे. गुप्ता आदींचे प्रेस मजदूर संघाने आभार मानले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.