Nashik Police Commissioner sandip karnik esakal
नाशिक

Nashik Police : टवाळखोरांना शहर पोलिसांचा ‘हिसका’; 321 टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई

Nashik Police : आगामी लोकसभा निवडणूक व शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police : आगामी लोकसभा निवडणूक व शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर शहर आयुक्तालय हददीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टवाळखोरांविरोधात धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये आयुक्तालय हद्दीतील ३२१ टवाळखोरांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे टवाळखोरांचे धाबे दणाणले आहेत. (nashik action against criminal by city police marathi news )

आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील घोषणा येत्या काही दिवसात होण्याची शक्यता आहे. तर, गेल्या काही दिवसांमध्ये शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांवर टीकेची झोडही उठली आहे. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, परिमंडळ एक व दोनमध्ये टवाळखोरांविरोधात धडक मोहीम राबविण्यात आली.(latest marathi news)

यात पोलिस ठाणेनिहाय पथकांनी उद्याने, मोकळी मैदाने, शाळा-महाविद्यालयांची मैदाने याठिकाणी रात्रीच्या टवाळक्या, मद्यपार्ट्या करणार्यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद देत कारवाईचा बडगा उगारला आहे. आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणेनिहाय फिक्स पॉईंट, नाकाबंदी, पेट्रोलिंग करण्यात आलेली होती.

परिमंडळ एकमधील आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, भद्रकाली, मुंबई नाका, सरकारवाडा, गंगापूर या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत १७७ टवाळखोर आणि तर, परिमंडळ दोनमधील अंबड, सातपूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यासह चुंचाळे पोलिस चौकी या हद्दीत १३३ टवाळखोर अशा ३२१ जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी अचानक राबविलेल्या या कारवाईमुळे रात्रीच्यावेळी उपद्रव माजविणार्यांचे धाबे दणाणले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT