Blooming marigold cultivation in a field along the Mumbai-Agra highway esakal
नाशिक

Nashik News : कसमादेत झेंडूच्या फुलांना भाव! दोनशे हेक्टरने झेंडूची लागवड घटली

Latest Nashik News : गेल्या वर्षीच्या तुलनेत चांदवड, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव पाच तालुक्यात झेंडु लागवडीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे यंदा झेंडूला मागणी असणार असून भाव वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

जलील शेख

मालेगाव : घटस्थापना, दसरा, दिवाळी या तीनही सणांना झेंडूच्या फुलांना महत्त्व असते. त्यामुळे झेंडूच्या फुलाला सर्वत्र मागणी असते. गेल्या वर्षीच्या तुलनेत चांदवड, सटाणा, देवळा, कळवण, मालेगाव पाच तालुक्यात झेंडु लागवडीचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे यंदा झेंडूला मागणी असणार असून भाव वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. (Price hike of marigold flowers in Kasmade)

कसमादे भागात सर्वात जास्त चांदवड तालुक्यात झेंडूची लागवड होते. जुलै ते ऑगस्ट या दोन महिन्यात झेंडूची लागवड केली जाते. २०२३-२४ मध्ये चांदवड तालुक्यात ४२२ हेक्टरवर झेंडूची लागवड झाली होती. चांदवड तालुक्यात २९४.२० हेक्टरवर झेंडूची लागवड करण्यात आली आहे. गेल्या वर्षांपेक्षा १२७.८० हेक्टरने चांदवड तालुक्यात झेंडूची लागवड घटली आहे.

शेतकऱ्यांची पाठ

झेंडूच्या बी-बियाणे, मजुरीत वाढ झाल्याने व ऐन सणासुदीच्या वेळी परजिल्ह्यातील झेंडू बाजारात विक्रीला येतात. लागवड खर्चही निघत नसल्याने चांदवड तालुक्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांनी यंदा पाठ फिरवली आहे. सटाणा येथे २ हेक्टरने यंदा लागवड वाढली आहे. सटाणा तालुक्यात चौंदाणे, जायखेडा, वटार या भागात झेंडूची लागवड आहे. कळवण तालुक्यात यंदाही झेंडूचे क्षेत्र कायम आहे.

गडाच्या पायथ्याला शेती

सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी, अभोणा, कनाशी यासह आदिवासी भागात झेंडूची लागवड होते. बहुसंख्य आदिवासी बांधव दसरा व दिवाळीला कुटुंबीयांसोबत मालेगावला मोसम पूल, सटाणा नाका, एकात्मता चौक, रावळगाव नाका, सोमवार बाजार, रामसेतू यासह अनेक भागात झेंडूच्या फुलांची विक्री करतात.

मात्र मालेगाव व देवळा तालुक्यात झेंडूची अल्प लागवड होते. चांदवड तालुक्यात वडाळीभोई येथे ९८.७५ हेक्टरवर, दुगाव येथे ६.५० हेक्टर, चांदवड परिसरात १८८.९५ हेक्टरवर लागवड करण्यात आल्याचे चांदवड तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. (latest marathi news)

झेंडूची लागवड

तालुका - गेल्या वर्षी लागवड - यंदाची लागवड

मालेगाव - ५ ते १० हेक्टर - १० ते १५ हेक्टर

चांदवड - ४२२ हेक्टर - २९४.२० हेक्टर

कळवण - २० हेक्टर - २५ हेक्टर

सटाणा - १० हेक्टर - १२ हेक्टर

"गेल्या वर्षी झेंडूला ७० ते ८० रुपये किलो भाव मिळत होता. उत्पादन घटल्यामुळे गणेशोत्सवापासून १६० रुपये किलोने विक्री होत आहे. भाव व मागणी असल्याने अनेक व्यापारी बांधावरून झेंडूची फुले घेऊन जात आहेत. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळीत फुलांना चांगली मागणी असल्याचा अंदाज आहे."- संजय शेळके झेंडु उत्पादक चांदवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT