Onion auction started on Monday in the market committee.  esakal
नाशिक

Onion Transport Ban: कांद्याच्या दरात 661 रुपयांची तेजी! अध्यादेश न आल्याने कांदा निर्यातबंदी हटविण्याबाबत संभ्रम

Onion News : सोमवारी सकाळी ३०० वाहनांतून कांदा विक्रीसाठी दाखल झाला.

सकाळ वृत्तसेवा

लासलगाव : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी (ता. १८) दुपारी कांदा निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सोमवारी (ता. १९) शनिवार (ता. १७)च्या तुलनेत लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात ६६१ रुपयांची वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. (nashik price increased onion export ban marathi news)

सोमवारी सकाळी ३०० वाहनांतून कांदा विक्रीसाठी दाखल झाला. कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार १०१, कमीतकमी एक हजार रुपये, तर सरासरी १८०० रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. शनिवारच्या तुलनेत कमीत कमी भाव ७०० रुपये, जास्तीत जास्त भाव एक हजार ४४१ रुपये, तर सरासरी भाव एक हजार २८० रुपये होता.

मात्र, अटी शर्ती न ठेवता संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी हटवण्याची मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केली आहे. सव्वादोन महिन्यांमध्ये विक्री झालेल्या कांद्याच्या पाठीमागे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने विक्री झालेल्या कांद्याला प्रतिक्विंटलमागे दोन ते तीन हजार रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे. (Latest Marathi News)

"निर्यातबंदीनंतर सोमवारी लासलगाव बाजार समितीत ५०० वाहनांमधून शनिवारच्या तुलनेत ६०० रुपयांची वाढ झाल्याचे आढळून आले. घाई न करता टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीस आणावा."-नरेंद्र वाढवणे, सचिव, बाजार समिती, लासलगाव

"निर्यातबंदी खुली झाल्याच्या कोणताही अध्यादेश नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी संभ्रमात आहे. बाजारभाव ५०० ते ६०० जास्त झाले, तरी अटी व शर्ती न लावता निर्यातबंदी खुली करावी. ओपन पद्धतीने निर्यातबंदी खुली करावी. सव्वादोन महिने निर्यातबंदी झाल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांचे करोडोंचे नुकसान झाले आहे. सर्वसाधारण व्यापाऱ्यांना अटी न लावता मुभा द्यावी."

-प्रवीण कदम, कांदा व्यापारी, लासलगाव

"आजच्या स्थितीला शेतकऱ्यांकडे लाल कांदा जवळपास संपत चालला आहे. केंद्रने घाईघाईने निवडणूक फंडा डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे. शेतकरी पूर्ण आर्थिक कोलमडल्यानंतर त्याला या निर्णयाचा किती फायदा होईल, हे सांगता येणार नाही. मायबाप सरकारने निर्यातबंदीऐवजी अन्य व्यवस्था शोधावी, पण निर्यातबंदी करू नये."

-भावराव काळे, कांदा उत्पादक, आंबेगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Mohammad Shami ने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ठोकली दावेदारी; गोलंदाजीनंतर फलंदाजीतही दाखवली चमक

Goa Tourism : जाऊ फुलपाखरांच्या गावा! गोव्यात बटरफ्लाय कंझर्व्हेटरीला नक्की भेट द्या, फि,वेळ आणि ठिकाण जाणून घ्या सर्वकाही

Vinod Tawde : अजित पवारांना सोबत घेतल्याचे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी स्पष्टच सांगितले कारण...

Vinod Tawde: पुन्हा शरद पवार पावसात भिजले; भाजपचे तावडे म्हणाले, हा जिंकण्याचा 'भ्रम'...

SCROLL FOR NEXT