पिंपळगाव बसवंत : रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची पोत घसरली आहे. त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता सुधारावी, यासाठी शेतकरी शेणखताचा वापर अधिक करतात. नाशिक जिल्ह्यात सध्या खरड छाटणी झालेल्या द्राक्षबागांना शेणखतांची मात्रा दिली जात आहे.
सोन्याच्या दराला ७३ हजार रूपयांची झळाळी मिळाली आहे. तशीच सुवर्ण झळाळी शेणखताला यंदा मिळताना दिसत आहे. आठ टन शेणखताला तब्बल २६ हजार रूपये मोजावे लागत आहे. मुंबईतील म्हशींच्या तबेल्यांमधून होणाऱ्या शेणखताचे अर्थकारण कोट्यवधी रूपयांमध्ये आहे. (Nashik price of dung increased news)
जमिनीत सुपीकता यावी, यासाठी शेतकरी आता सेंद्रीय शेती, जैविक शेतीवर भर देतात. त्यासाठी मुख्यत: शेणखताचा वापर केला जातो. द्राक्षांची काढणी होऊन हंगाम संपल्यानंतर द्राक्षबागांची खरड छाटणी करण्याची लगबग सध्या सुरू आहे. छाटणी पश्चात शेणखताचे डोस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेणखतामुळे द्राक्षवेलींच्या मुळ्या परिपक्व होऊन विविध सुक्ष्म अन्नद्रव्ये मिळत असतात. त्याचा फायदा पुढे फळधारणेला होत असतो.
कोट्यवधी रूपयांची उलाढाल
मुंबईतील वाशी, कल्याण, भिवंडी आदी परिसरात म्हशीचे तबेले आहेत. नाशिकहुन कांदा, भाजीपाला घेऊन जाणाऱ्या ट्रक परतीच्या प्रवासात शेणखत घेऊन येतात. साधारण एका ट्रकमध्ये सुमारे आठ टन खत वाहतूक करण्याची क्षमता आहे. नाशिक जिल्ह्यात दीड लाख एकरहुन अधिक द्राक्षबागा आहेत.
त्यांना साधारण बारा लाख टन शेणखताची गरज भासते. दोन वर्षापूर्वी शेणखताच्या आठ टनाला २० हजार रूपयांचा दर होता. यंदा अखेरच्या टप्प्यात द्राक्षाचे भाव अनेपक्षितपणे तेजीत आले. शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याने पुढील वर्षीच्या हंगामाचे नियोजन आतापासूनच केले जात आहे. (latest marathi news)
त्यासाठी शेणखताची मागणी वाढली आहे. मागणी वाढल्याने दरही वधारले आहेत. एका शेणखताच्या ट्रकला २६ हजार रूपये किंमत आहे. त्यामुळे शेणखतातून कोट्यवधी रूपयांचे अर्थकारण फिरत आहे. शेणखताच्या पुरवठादारांमार्फत व्यवहार चालतात. मुंबईबरोबरच गुजरातवरूनही शेणखताचा नाशिक जिल्ह्यात पुरवठा होतो. पण, मुंबईचे शेणखत अधिक कसदार असल्याने शेतकरी त्याला पसंती देतात.
"खरड छाटणीनंतर शेणखताची मात्रा दिल्यास द्राक्षवेलीत अन्नद्रव्य अधिक प्रमाणात तयार होतात. त्याचा लाभ फळधारणेला होत असतो. शेणखताच्या भावात यंदा तीस टक्के वाढ झाली आहे."- राजेंद्र खोडे, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.