पिंपळगाव बसवंत : भारतासह बांग्लादेशला टोमॅटोचा पुरवठा करण्याची भिस्त नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोच्या क्रेटला (२० किलो) एक हजार ३१ रूपये असा उच्चांकी भाव मिळाला आहे. यामुळे टोमॅटोची लाली पुन्हा चकाकली आहे. आजच्या भावाने पंचवीस वर्षातील सर्वकालीन उंची गाठली. घटलेली आवक व वाढती मागणी यामुळे टोमॅटोचे दर सोन्याप्रमाणे उजळले आहेत. टोमॅटोने शेतकऱ्यांना यंदा मालामाल केले आहे. ( price of tomato one thousand rupees per crate to Pimpalgaon
दीड महिन्यापासून सुरू झालेला टोमॅटोचा हंगामात पाचशे रूपये प्रतिक्रेटच्या खाली दर आले नाही. मुळात लागवड कमी त्यात पंधरा दिवसापूर्वी झालेल्या पावसाचा टोमॅटोच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटोची आवक पन्नास हजार क्रेटवर आली आहे. सोमवारी पिंपळगाव बाजार समितीत टोमॅटो विक्रीसाठी येताच परराज्यातील आलेली मागणी पूर्ण करण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये मोठी चढाओढ लागली. (latest marathi news)
टोमॅटोसाठी स्पर्धा झाल्याने वीस किलो टोमॅटोच्या क्रेटला तब्बल एक हजार ३१ रूपये भाव मिळाला. तर सरासरी ८८१ रूपये दराने टोमॅटोची विक्री झाली. शेतकऱ्यांना आकर्षक दर मिळाल्याने पिंपळगाव शहरातील बाजारपेठेतील उलाढाल वाढली.
''देशांतर्गत टोमॅटोला सर्वत्र मागणी आहे. पिंपळगाव वगळता इतर ठिकाणचा हंगाम संपला आहे. मागणीपेक्षा आवकही कमी आहे. त्यामुळे टोमॅटोचे दर हजार रूपये क्रेटच्या पुढे गेले आहे. दराची ही तेजी कायम राहील.''-सोमनाथ निमसे, संचालक मातोश्री व्हेजिटेबल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.