Makhana esakal
नाशिक

Nashik News : आरोग्याच्या सजगतेमुळे ‘मखाना’ चे भाव गगनाला; दीड हजार रुपयाचे दर

Nashik : फिजिकल फिटनेससाठी अनेक नागरिक जागरूक झाले आहे. यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नही करीत असतात.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : फिजिकल फिटनेससाठी अनेक नागरिक जागरूक झाले आहे. यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नही करीत असतात. वजन कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ डायट फूडच्या स्वरूपात आहारात येतो. यामधील सर्वात लोकप्रिय असा पदार्थ म्हणजे मखाना होय. दोन महिन्यापूर्वी ८००-९०० रुपये किलोने विकत घेतला जाणारा मखाना. आता जवळपास दीड हजार रुपयाने विकला जात आहे. (Prices of Makhana hike Rate of Rs 1500 )

त्यामुळे डायट करणाऱ्यांना आजारापेक्षा इलाजच भयंकर, असं वाटू लागलं आहे. वाढते वजन हे अनेकांची सध्याची प्रमुख समस्या आहे. एकदा वजन वाढले की त्याअनुषंगाने येणाऱ्या आजारांनाही आमंत्रण मिळते. त्यासाठी नागरिक जॉगिंग, रनिंग, सायकलिंग, झुंबा, योगा, जिम असे एक ना अनेक प्रकारचे व्यायाम करीत असतात. मात्र, वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे आहारावर नियंत्रण.

डायटेशन सांगतात, की ८० टक्के डायट व २० टक्के व्यायाम आवश्यक आहे. वजन नियंत्रणात ठेवणे व कमी करणे यासाठी आहारामध्ये डायटीशियनच्या सल्ल्यानुसार नागरिक आहार घेता व अनेक पदार्थ आहारातील टाळतात. शरीरात जेवढे कॅलरी आवश्यक आहे तेवढाच आहार गेलाच पाहिजे. यासाठी फलाहार सुचविला जातो. त्याचबरोबर मखाना हा अलीकडच्या काळात लोकप्रिय झालेला पदार्थ होय. (latest marathi news)

मखाना आहारात घेतल्याचे फायदे

-वजन कमी होते

- रक्तदाब नियंत्रण

-डायबिटीज व्यक्तींसाठी फायदेशीर

-रक्ताचे प्रमाण वाढते

-हाडे मजबूत होतात

-डायरिया

-वातदोष

-हृदयाच्या समस्या रोखल्या जातात

-पोट स्वच्छ राहते.

-वृद्धत्वविरोधी गुणधर्म आहेत

-कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे

-पचनासाठी चांगले,वय काहीही असो

-भूक सुधारते

-श्वसन प्रणाली,शिरा आणि पचनास मदत करते

-निद्रानाश,धडधडणे,चिडचिड या उपचारांसाठी चांगले

असंख्य रेसिपी

मखाना प्रकार बऱ्याचशा लोकांनी फार कमी वेळा ऐकलेला असतो किंवा काहींनी पाहिलेला देखील नसतो.मखाना हा एक पौष्टिक पदार्थ आहे जो स्नॅकचा एक प्रकार आहे. मखाने दिसायला पॉपकॉर्न सारखे व वजनाला अतिशय हलके असतात. मखाना हे एक लो कॅलरी फूड आहे ज्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते म्हणून सेलिब्रिटी आहारामध्ये मखानाचा समावेश आवर्जून करतात. मखाना हा असा पदार्थ आहे की जो जवळपास सगळ्याच म्हणजे गोड, तिखट, दूध-दही, फ्राय रोस्ट या स्वरूपात वेगवेगळ्या पद्धतीने बनविला जातो जशी चव हवी आहे. तसा मखाने बनविले जातात. मखाना असलेल्या असंख्य रेसिपी आहे.

''मखाना हा पदार्थ खरेदी करणारा एक विशिष्ट वर्ग आहे. सर्वच ग्राहक काही खरेदी करत नाही. आरोग्याशी संबंधित असल्यामुळे काही ग्राहक यास पसंती देतात मात्र दोन महिन्यात इतक्या मोठ्या किंमत वाढ झाल्यामुळे आश्चर्य वाटत आहे. अलीकडे आरोग्याच्या काळजीपोटी अनेक जण वेगवेगळ्या पसंती देतात. ती संख्या वाढल्यामुळे मखानाचे भाव वाढले असावेत.''- वैभव मोरे, वैभव किराणा स्टोअर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT