नाशिक/ पंचवटी : पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी बुधवारच्या आठवडे बाजारातील सर्वच भाज्यांचे भाव तेजीत राहिले. त्यामुळे गृहिणींचे बजेट काही प्रमाणात कोलमडले. दुसरीकडे नाशिक बाजार समितीत पालेभाज्यांची आवक घटली असून, ती २५ ते ३० टक्क्यांवर आली आहे. आवक घटल्याने बाजारभाव वधारले आहेत. आजपासून पितृपक्षाला सुरवात झाली. या काळात मेथी, भेंडी, गवार, कारली, आळूची पाने यांना जेवणात मोठे महत्त्व असते. मात्र गत आठवड्यापर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक बाजार समितीतील आवक मंदावली. (Prices of vegetables have been increasing in market for weeks )
मात्र मागणी कायम असल्याने सर्वच प्रकाराच्या भाज्यांचे दर किलोभर भाजीसाठी ऐंशी ते शंभर रुपये मोजावे लागत आहे. टोमॅटो वगळता सर्वच भाज्या तेजीत राहिल्या. बाजार समितीत बुधवार झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर किमान ३५ ते सर्वाधिक १९० रुपये, चायना कोथिंबीर किमान ५० ते २३० रुपये, मेथी २५ ते ९८ रुपये, शेपू २० ते ४५ रुपये जुडी, कांदापात २० ते ४१ रुपये जुडीला भाव मिळाला आहे.
काकडी २० ते ३५ रुपये किलो , किलो दर, दुधी भोपळा १५ रुपये प्रति किलो ते २५ रुपये प्रति किलो, गिलके ३५ ते ५० रुपये किलो, कारले ३० ४५ रुपये प्रतिकिलो, दोडका ४५ ते ६० रुपये प्रतिकिलो, शिमला मिरची ७५ ते १०० रुपये प्रतिकिलो, हिरवी मिरची ३० ते ४५ रुपये प्रतिकिलो, वाटाणा १६० ते १८० रुपये प्रतिकिलो, वाल ४५ ते ६० रुपये प्रतिकिलो, गवार २५ ते ३५ रुपये प्रतिकिलो, घेवडा ४५ ते ६० रुपये प्रतिकिलो, गाजर २५ रुपये ते ३० रुपये प्रतिकिलो, वांगी ३५ ते ४५ रुपये प्रतिकिलो, भेंडी २० ते २५ प्रतिकिलो रुपये. (latest marathi news)
आठवडे बाजारातील भाव
गवार गावठी - १८० ते २०० रुपये किलो.
मेथीची जुडी - ५० ते ६० रुपये
कारली - ८० रु. किलो रुपये
भेंडी - ८० रुपये किलो
बटाटे - ४० ते ५० रुपये किलो.
टोमॅटो - ४० रुपये
वांगी - ४० रुपये किलो.
आळूची पाने - १५ ते २० रुपये गड्डी
गावठी गवार दोनशे रुपये किलो
पितृपक्षात इतर काही भाज्यांप्रमाणे गवारीला मोठे महत्त्व असते. बुधवारच्या आठवडे बाजारात आज विलायती गवार शंभर ते एकशेवीस रुपये किलो तर किलोभर गावठी गवारीसाठी चक्क दोनशे रुपये मोजावे लागत होते. पितृपक्षात जेवणासाठी केळीच्या पानांचे मोठे महत्त्व आहे. त्यासाठी आदिवासी भागातून केळीची पाने घेऊन विक्रेते मोठ्या संख्येने शहरात दाखल झाले आहेत. पाच केळीच्या पानांसाठी चाळीस ते पन्नास रुपये असा दर आहे.
आवक कमी होण्याची कारणे
- पावसात फळभाज्यांची (फळाची) फूल उमलते मात्र, उन्हामुळे ते करपून जाते.
- फुलाचे फळात रूपांतर होतं नाही, परिणामी उत्पादन कमी होते
- परिणामी आवक कमी होते
- इतर राज्यात उत्पादन कमी असल्याने मागणी अधिक आहे
- पावसामुळे पालेभाज्या उत्पादनावर परिमाण होतो
- त्यामुळे आवक घटते, परिणामी बाजारभाव वाढतात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.