PM Narendra Modi esakal
नाशिक

Nashik PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाकरे-पवारांवर जोरदार टीकास्त्र; धर्मावर आधारित बजेटचा घाट

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी पक्ष यांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण नक्की होणारच आहे. (Prime Minister Narendra Modi criticized Sharad Pawar and Uddhav Thackeray)

हे जेव्हा होईल तेव्हा, मला सर्वांत जास्त आठवण (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांची येईल. बाळासाहेब म्हणायचे, की मला काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली की मी माझे दुकान बंद करेल. मात्र आता विनाश होत आहे. आता नकली शिवसेनेचे अस्तित्व राहणार नाही. काँग्रेस वोट बँकेसाठी बजेटचा वापर करत असून, धर्माच्या नावावर बजेट करण्याचा घाट घातला असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर आज केला.

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत (ता. निफाड) येथे महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार आणि हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता. १५) निर्धार सभा झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री दादा भुसे यांसह आमदार उपस्थित होते.

पंतप्रधान मोदी यांनी ‘जय शिवाजी’च्या घोषणा देत सप्तशृंगी मातेला आणि नाशिकच्या प्रभू श्रीरामचंद्राला नमन करतो, असे मराठीत बोलत भाषणाला सुरवात केली. काशीत बाबा विश्वनाथ आणि कालभैरवाचा आशीर्वाद घेऊन उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आज त्र्यंबकेश्वर, नाशिकच्या धर्तीवर आलो आहे.

तुमची सेवा हेच माझ्या आयुष्यातील ध्येय असल्याचे त्यांनी सांगत तुम्ही मागील दहा वर्षांत माझे काम पाहिले आहे. तिसऱ्या टर्मसाठी आशीर्वाद मागण्यास मी तुमच्याकडे आलो आहे, असे सांगत काँग्रेसचे इतके हाल आहेत, की त्यांचे महाराष्ट्रातील एक नेते मतदान संपल्यावर काँग्रेसमध्ये विलीन होऊन जावे. आपले दुकान बंद करावे, असे त्यांना वाटते आहे. (latest marathi news)

सगळे एकत्र आले की विरोधक बनतील अशी त्यांची स्थिती आहे, असा टोला मोदींनी अप्रत्यक्ष शरद पवार यांना या वेळी लगावला. मोदी म्हणाले, जेव्हा या नकली शिवसेनेचे विलीनीकरण होईल तेव्हा मला सर्वाधिक आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येईल. (स्व.) ठाकरे म्हणायचे, शिवसेना काँग्रेस बनल्याचे कळेल तेव्हा शिवसेना बंद करून टाकेल.

म्हणजे नकली शिवसेनेचा आता पत्ताही राहणार नाही. हा विनाश होत आहे. त्याने बाळासाहेब दुःखी होतील. नकली शिवसेनेने बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नांना उद्‌ध्वस्त केले असल्याचे सांगत मोदींनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (स्व.) ठाकरेंचं स्वप्न होते अयोध्येत राम मंदिर उभे राहावे, जम्मू-काश्मीरमधून कलम ३७३ रद्द व्हावे.

हे स्वप्न पूर्ण झाले. परंतु याची नकली शिवसेनेला चीड येत आहे. काँग्रेसने प्राणप्रतिष्ठेच्या निमंत्रणाला नकार दिला. नकली शिवसेनेनेही तोच मार्ग निवडला. काँग्रेसचे लोक मंदिरावरून चुकीचे बोलत आहे. नकली शिवसेना यावर गप्प आहे. यांची पार्टनरशिप ही पापाची पार्टनरशिप आहे. महाराष्ट्रासमोर यांचे पाप उघडे झाले असल्याची टीका मोदींनी या वेळी केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना दिवसरात्र काँग्रेस शिवी घालत असतानादेखील नकली शिवसेनेने काँग्रेससमोर गुडघे टेकले आहे. राज्यातील जनता या लोकांना कधीही माफ करणार नाही. शिक्षा देईल, असेही त्यांनी सांगितले. सभेला आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, दिलीप बनकर, अॅड. माणिकराव कोकाटे.

नितीन पवार, सुहास कांदे, सरोज आहिरे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी आमदार बाळासाहेब सानप, धनराज महाले, संघटक विजय चौधरी, लक्ष्मण सावजी, विजय साने, सुनील बच्छाव, शंकर वाघ, प्रशांत जाधव, रजंन ठाकरे, अजय बोरस्ते, अकुंश पवार, प्रकाश लोंढे, अॅड, रवींद्र पगार, एन. डी, गावित, भाऊलाल तांबडे, अमृता पवार, डॉ. आत्माराम कुंभार्डे, हेमंत धात्रक, यतीन कदम आदी

धर्मावर आधारित बजेट करतील

पंतप्रधान मोदी यांनी सभेत काँग्रेस वोटबँकेसाठी आता बजेटचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला. मोदी म्हणाले, देशातील सरकारे जेवढा बजेट तयार करते त्यातील १५ टक्के खर्च फक्त अल्पसंख्याकांवर केला जात आहे. म्हणजे धर्माच्या आधारे बजेटचे वाटप केले. धर्माच्या आधारे त्यांनी देशाचे तुकडे केले.

आताही धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप करत आहे. धर्माच्या आधारे बजेटच्या वितरणाला मंजुरी दिली होती, असे सांगत त्यांनी काँग्रेसवर टीका केली. बजेटचे असे तुकडे करणे हे भयंकर आहे. काँग्रेससाठी अल्पसंख्याक फक्त एकच आहे. त्यांची ती प्रिय वोटबँक आहे. मी मुख्यमंत्री असताना जेव्हा काँग्रेसने ही गोष्ट उचलली होती तेव्हा मी मुख्यमंत्री म्हणून त्याला विरोध केला होता.

काँग्रेसला तेव्हा देशातील सर्व बजेटमधील १५ टक्के फक्त मुसलमानांवर खर्च व्हावा, असे वाटत होते. मात्र, भाजपच्या विरोधामुळे ते शक्य झाले नाही. हा जुना अजेंड्या आणण्याचा त्यांच्याकडून घाट घातला जात असल्याचा आरोप मोदींनी केला.

पंतप्रधान मोदींची सभा, पिंपळगाव बसवंत

मोदींनी कोणत्या मुद्यासाठी किती वेळ दिला?

भाषण कालावधी : २७ मिनिटे

३.४२ - मराठी वाक्याने भाषणाला सुरवात, प्रास्ताविक (२ मिनिटे)

३.४४ - काँग्रेसवर टीका (२ मिनिटे)

३.४६ - नकली शिवसेना व नकली राष्ट्रवादी (५ मिनिटे)

३.५१ - केंद्र सरकारची कामे व बजेट वाटणी (५ मिनिटे)

३.५६ - आरक्षण (३ मिनिटे)

३.५९ - निवडणुकीचे महत्त्व (१ मिनीट)

४.०० - कोरोनात केंद्र सरकारची कामगिरी (२ मिनिटे)

४.०२ - मोदींचा फोकस... शेतकरी, जवान, नारीशक्ती व गरीब सशक्तीकरण (३ मिनिटे)

४.०५ - कांदाप्रश्‍न (३ मिनिटे)

४.०८ - मतदानवाढ व विजयाचे आवाहन (१ मिनिटे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT