Nashik News : नाशिक- पुणे महामार्गावरील डॉ. आंबेडकरनगर सिग्नल ते उपनगरपर्यंत रस्त्याची अक्षरश चाळणी झालेली आहे. दोन महिन्यापूर्वीच द्वारका ते दत्तमंदिर मार्गावरील डांबरीकरण झाले होते. तरीही या रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. या महामार्गावरील देखभाल व दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकामाच्या महामार्ग विभागाकडे आहे. जे काम अपेक्षित होते, तेही अपूर्ण आहे. जवळपास दहा दिवसापासून नाशिक शहरामध्ये एक, दोन वगळता मोठा पाऊस झालेला नाही. (problems on Dwarka Datta Mandir road are increasing day by day )
पावसामुळे खराब झालेला रस्ता व उर्वरित अपूर्ण असलेले काम केले गेले काही दिवसापासून तर काम पूर्णपणे बंद असल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करत आहे. या मार्गावरील मार्किंग, पांढरे पट्टे अजूनही एका बाजूचे पूर्ण बाकी आहे. दुभाजकावरील रंगकामही अपूर्ण आहे. तसेच दुभाजकांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे तयार झाली आहे. क्रॉसिंगच्या ठिकाणी डिव्हायडर फुटलेले आहे. दर तीन वर्षांनी या मार्गावरील देखभाल व दुरुस्तीचे काम केले जाते. (latest marathi news)
मात्र अद्याप या मार्गावरील समस्या सुटण्यापेक्षा वाढतच अधिक आहे. नागरिकांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी शासनाने तरतूद केलेली असते. मात्र तरतुदीत दिल्याप्रमाणे अटी व शर्ती पाळल्या जात नाही. त्यामुळे रस्त्याची दर्जा हा दिवसेंदिवस काम करूनही खालावत जात आहे. अजून ऑगस्ट महिना पूर्ण झालेला नाही. पाऊस सप्टेंबर व ऑक्टोबरपर्यंत ही सुरू राहील. जोरदार पाऊस झाला तर रस्त्याची दुरवस्था अजून यापेक्षाही भयानक होईल. तरी लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करून उर्वरित काम पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
''निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे रस्त्याची वाताहत झालेली आहे. पावसामुळे रस्ता खड्डे पडून काही ठिकाणी निसरडा झालेला. यामुळे अनेक दुचाकीस्वार घसरून दुखापतही झालेली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित रस्त्याची दुरुस्ती करावी.''- नीलेश सहाणे, वरद फाउंडेशन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.