Nashik News : नाशिकसारख्या छोट्या शहरांमधील कल्पकता असणाऱ्या विविध व्यक्तींना एकत्र आणून शहराचा चांगल्या प्रकारे विकास करता येऊ शकतो. समस्या सोडविण्यासाठी काय मार्ग असू शकतात, यांचा ऊहापोह ‘नाशिक प्रोजेक्ट’ने केला. छोट्या शहरांमध्ये काम करणाऱ्या वक्त्यांना एकत्र आणत विविध दृष्टिकोनांवर चर्चा करण्याबरोबरच त्यातून नाशिक शहराला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी विविध दृष्टिकोनांचा अभ्यास.
विविध शहरांमध्ये झालेली कामे नाशिकमध्ये करता येऊ शकतात का, यांसह समस्यांचे समाधान कसे करायचे आणि संभाव्य मार्ग काय असू शकतात, यासाठी उंटवाडी येथील इंजिनिअर्स इन्स्टिट्यूटच्या अशोका हॉल येथे शुक्रवारी (ता. १९) नाशिकमधील आर्किटेक्टसतर्फे झालेल्या चर्चासत्रात मान्यवरांनी सहभाग घेतला.
देशभरातील मान्यवरांकडून ऑनलाइन मार्ददर्शन करण्यात आले. उदघाटन समारंभात आर्किटेक्चर क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शकांनी केले. श्रेयांक खेमलापुरे (बेळगाव) आणि पुष्कर सोहोनी (पुणे) यांनी लहान शहरांची महत्त्व व इतिहास यावर विचार मांडले. सोनल मितल (सुरत) यांनी ‘विस्मरण आणि प्रतिकारशक्तीचे युग’ या विषयावर सखोल सादरीकरण केले. (latest marathi news)
बॉबी देसाई (एचसीपी आर्किटेक्ट्स, अहमदाबाद) यांनी ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉर प्रकल्प’ यावर सविस्तर सादरीकरण केले. सादरीकरणात शहराच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यात आला. या सादरीकरणाचे नियंत्रण शहरातील आर्किटेक्ट्सनी केले.
गेडाम यांची आज उपस्थिती
शनिवारी होणाऱ्या सत्रांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. या सत्रात वडोदरा, बेळगाव, आणि गोवा यावर विचार मांडले जातील. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम उपस्थित राहणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.