Property Fraud esakal
नाशिक

Nashik Property Fraud: घरांच्या विक्रीत फसवणुकीचे वाढते प्रकार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Property Fraud : शहरात घर विक्रीच्या घटनांत फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. शहरात दोन वेगवेगळ्या घटनांत घराच्या व्यवहारात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. एका घटनेत एकाशी व्यवहार करून बंगला दुसऱ्यालाच विकल्याचा प्रकार समोर आला आहे.

या घटनेत महिलेची २० लाखाची फसवणूक करण्यात आली असून, याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Property Fraud growing trend of fraud in sale of houses)

अमित दिलीप कुलकर्णी, दिलीप काशिनाथ कुलकर्णी, पल्लवी अमित कुलकर्णी (रा. तिघे पार्वतीबाई नगर, जेल रोड) व हेमंत सोनवणे (रा. जेल रोड) आणि दीपक मोरेश्वर जोशी, अशी संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी तृप्ती प्रफुल्ल दळवी (रा. शेलार मळा, जेल रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. संशयितांच्या सर्व्हे नं. ४९ मधील स्वामी नावाच्या बंगल्याचा दळवी यांनी २०२० मध्ये व्यवहार केला होता.

२० लाखाची रक्कम अदा करण्यात आल्याने संशयितांनी त्याबाबत साठे खत व स्पेशल जनरल मुखत्यारपत्र नोंदणीकृत करून दिले होते. या मिळकतीचे खरेदी न देता मात्र कालांतराने संशयितांनी सदरची मिळकत परस्पर दुसऱ्या इसमास नोंदणीकृत साठे खत करून दिले.

याबाबत तक्रारदार महिलेने संशयितांना जाब विचारला असता त्यांनी शिवीगाळ व दमदाटी केल्याने हा प्रकार पोलिसात पोचला असून अधिक तपास उपनिरीक्षक मंगेश गोळे करीत आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बनावट दस्ताच्या आधारे प्लॅटची विक्री

दुसऱ्या घटनेत इमारतीच्या पुनर्निर्मिती सदस्यांना विश्वासात न घेता महापालिकेचा मंजूर प्लॅन बदलून व नव्याने तयार करून सदर जागा बनावट दस्त ऐवजाच्या आधारे बनावट दस्तनोंदणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात सभासदांची तब्बल चाळीस लाखाची फसवणूक झाली असून, न्यायालयाच्या आदेशानुसार सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण दादाजी आहेर, भावना अरुण आहेर, आशिष अरुण आहेर, प्रवीण प्रभाकर पाठक व मारुती तानाजी गडकरी (रा. सर्व नीलेश अपार्टमेंट, कुलकर्णी गार्डन मागे, शरणपूर रोड) अशी संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी आरिफ अमीर अरब (रा. महागिरी ठाणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अरब यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्र्यंबक रोडवरील हिंद को. ऑप हाउसिंग.

सोसायटी पुनर्निर्मिती करण्यासाठी संशयितांनी २००४ ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान महापालिकेचा मंजूर प्लॅन बदलून नविन प्लॅन तयार केला. या वेळी बनावट ठराव करून जागा प्रवीण पाठक यांच्या नावे खरेदी केल्याचे बनावट दस्त नोंदणीकृत करून सदस्यांची ४० लाखाची फसवणूक केल्याचे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Trust chairman: टाटा ट्रस्टचा पुढील अध्यक्ष कोण होणार? नोएल टाटांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता

Latest Marathi News Updates : नवीन शैक्षणिक धोरणात महाराष्ट्र आघाडीवर - चंद्रकांत पाटील

Ladki Bahin Yojana : पैसे काढण्यासाठी लाडक्या बहिणींची झुंबड! शासकीय बँकांबाहेर महिलांच्या रांगा; खात्यावरील पैसे मिळवताना दमछाक

Jalgaon Bribe Crime: पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त, लेखाधिकाऱ्यास अटक; 25 हजारांची लाच घेताना पुणे सीबीआय पथकाचा छापा

Nashik News : बोधीवृक्षांमुळे देश-विदेशातील पर्यटकांची मांदियाळी! त्रिरश्मी लेणी रोपणास एक वर्ष पूर्ण

SCROLL FOR NEXT