Patra protection rock on Nasardi bridge blown away by rain. esakal
नाशिक

Nashik News : ‘नासर्डी’चा संरक्षक कठडा एका पावसात गायब! वाहन नदीत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता

Nashik : नाशिक- पुणे महामार्गावरील नासर्डी पुलावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला पत्र्याचा कठडा हा एका पावसातच उडून गेला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक- पुणे महामार्गावरील नासर्डी पुलावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्पुरत्या स्वरूपात उभारलेला पत्र्याचा कठडा हा एका पावसातच उडून गेला आहे. यावरून सदर विभाग नागरिकांच्या सुरक्षितेबद्दल किती सजग आहे यावरून लक्षात येते. मुळात या ठिकाणी संरक्षक कठडा अनेक महिने नव्हताच, ‘सकाळ’ वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचा कठडा उभारण्यात आला. नासर्डी पुलावरून रोज हजारोच्या संख्येने वाहने धावतात. (protective rock of Nasardi bridge disappeared in rain )

शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा द्वारका सर्कल आहे. ते या पुलापासून अगदी काही अंतरावर आहे. पुणे, शिर्डी, नगर यासह अनेक जिल्ह्यात जाण्यासाठी हा एकमेव महामार्ग आहे. छोट्या व मोठ्या अवजड वाहने, स्कूल बस, नोकरदार, कामगार वर्ग यासह नाशिक शहरात येणारे व नाशिक रोडकडे जाणारे याच रस्त्यावरून प्रवास करतात. द्वारका ते सिन्नरपर्यंत दुरुस्ती व देखभालीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.

या रस्त्यावर वारंवार नियमित दुरुस्तीची व डांबरीकरण सुरूच असतात. पण कठड्याकडे आतापर्यंत लक्ष गेले नाही याबद्दल आश्चर्य आहे. एका वादळी पावसाच्या झटक्याने तात्पुरता उभारलेला कठडा कोलमडून पडला आहे. दुर्दैवाने एखादे वाहनाला जर अंदाज आला नाही तर कठडा नसल्यामुळे थेट वाहन नदीत कोसळून व मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. (latest marathi news)

दुरुस्तीचे कामातही दुर्लक्ष

नाशिक पुणे महामार्गावर द्वारका ते दत्तमंदिरापर्यंत सध्या डांबरीकरण व दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे यासाठी कॉन्ट्रॅक्टर व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी प्रयत्न करीत आहे. सदर कामाचे इस्टिमेट १९.४२ कोटी आहे. इतक्या मोठ्या बजेटच काम सुरू असताना त्या तुलनेत अतिशय कमी खर्चात व पक्क्या स्वरूपाचा संरक्षक कठडा एका आठवड्यात उभारला जाऊ शकतो. मात्र डांबरीकरण व दुरुस्ती यामध्ये विशेष रस असल्यामुळे कठड्याकडे दुर्लक्ष झाल्याचं सध्या तरी दिसत आहे.

''संरक्षक कठडे एका पावसात गायब होत असेल तर हे अतिशय गंभीर आहे. स्कूलची शेकडो मुले बसने तसेच पालकांच्या मार्फत प्रवास करतात. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष घालून संरक्षक कठडा तोही पक्क्या स्वरूपाचा उभारणे आवश्यक आहे.''डॉ. मनोहर महाजन, प्राचार्य, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तपोवन

''पुलावरील कठडे खूप वर्षांपूर्वी बांधलेले आहे. ते जीर्ण झाल्यामुळे गळून पडले होते. म्हणून तेथे तात्पुरत्या स्वरूपाचा पत्राचा कठडा लावण्यात आला होता. पक्क्या स्वरूपाचा कठडा उभारण्यासाठीचे इस्टिमेट आमच्या विभागात सादर केलेले आहे. मंजुरी मिळताच कठडा उभारण्याचे काम तत्काळ सुरू होईल.''- सतीश आहेर, उपअभियंता सार्व. बांधकाम (महामार्ग)विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

SCROLL FOR NEXT